crime Sakal Media
पुणे

व्यावसायाच्या बहाण्याने शेतकऱ्याची साडेपाच लाखांची फसवणूक

राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

किरण भदे ः सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : शेतकरयाशी ओळख वाढवुन भागीदारीत प्रिंटींग व्यवसाय करण्याचा बहाणा करुन वेळो वेळी पैसे घेत सुमारे 5 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक करुन बेपत्ता झालेल्या इसमाविरोधात राजगड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम नागू रांजणे (वय 52 रा. खडकी ता. भोर) या शेतकऱ्याने ही फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, त्यानुसार अभिजीत अविनाश मुळे (रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा) व सदाशिव यशवंत मांडवे (रा. सातारा जि. सातारा) या दोघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदिप घोरपडे यांनी याबाबत माहीती देताना सांगितले की, तक्रारदार सुदाम रांजणे व अभिजीत मुळे यांची ओळख झाल्यावर मुळे याने माझा बँग प्रिंटिंगचा व्यवसाय असून तो चांगला चालला आहे. असे सांगितले व रांजणे यांचा विश्वास संपादन करुन माझ्या व्यवसाय आधुनिक करायचा असून त्यासाठी पैशांची गरज आहे. तुम्ही या मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदा मिळवून देतो असे सांगून दोघांनी मिळून स्वामी समर्थ बँग प्रिंटीग नावाने भागीदारीत व्यवसाय करायचे ठरवून तसे भागीदारी पत्र नोटरी करुन घेतले होते. दरम्यान काळात मुळे याने रांजणे यांना आपल्याला शिलाई मशिन व प्रिंटीग मशिन खरेदी करायचे आहे त्यासाठी सदाशिव यशवंत मांडवे याला एक लाख रुपये पाठवण्यास सांगितले ते रांजणे यांनी पाठवले. त्या नंतर दुकानचे भाडे व मशिनरी खरेदी साठी दीड लाख रुपये, नंतर पुन्हा शिलाई मशिनसाठी 50 हजार असे पैसे घेतले तसेच वेळो वेळी 2 लाख 46 हजार रुपये रोख असे मिळून 5 लाख 46 हजार रुपये मुळे व मांडवे यांनी घेतले, परंतू नंतर व्यवसायाबाबत रांजणे यांना काहीच माहीती देत नव्हते व बोलण्याचे टाळत होते. यावर रांजणे यांना शंका आल्यावर त्यांनी मुळे यांच्या बाबत चौकशी केली असता मुळे याने कोणताही व्यवसाय सुरु केला नसून आपली फसवणुक करत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मुळे व मांडवे यांच्या विरोधात राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आरोपी अभिजीत मुळे व सदाशिव मांडवे हे दोघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रमोद भोसले पुढील तपास करत आहेत. सदर आरोपी अभिजीत मुळे याने अजून कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे अवाहन पोलिस निरीक्षक संदिप घोरपडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT