maha.jpg 
पुणे

दोन भावांच्या विरोधात दीड लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : शो साठी दुकानाच्या भिंतीवर वीज मीटर लटकावून, कुल्फी दुकानासाठी वर्षभऱाहून अधिक काळ थेट खांबावरुन बेकायदा विजेचा वापर करणाऱ्या शिंदवणे (ता. हवेली) येथील दोन भावांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने लोणी काळभोर पोलिसांत दीड लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

रमेश विठ्ठल महाडिक व अभिजित रमेश महाडीक ( दोघे रा. पाटील वस्ती, शिंदवणे, ता. हवेली) ही त्या महावितरण कंपनीला फसविणाऱ्या दोन भावांची नावे असून, हा प्रकार मार्च २०१९ ते मार्च २०२० या वर्षभराच्या काळात घडला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाल श्रीराम पाटील यांनी तक्रार दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश महाडिक व अभिजित महाडीक यांच्या मालकिचे शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत कुल्फीचे दुकान आहे. मागिल मार्च महिण्याच्या पहिल्या आठवड्यात महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संजय जाधव व तंत्रज्ञ महेश दरेकर हे दोघेजण मिटर तपासणीसाठी महाडीक यांच्या दुकानात गेले असता, त्यांना दुकानाच्या भिंतीवर विज मिटर लटकावल्याचे आढळून आले. यावर संजय जाधव व महेश दरेकर या दोघांनी मिटरची बारकाईने पाहणी केली असता, मीटरला विज जोडणीसाठी विजेच्या खांबावरुन आलेली विजेची वायर मिटरला जोडली नसल्याचे, जाधव यांच्या लक्षात आले. यावर जाधव व दरेकर यांनी बारकाईने पाहणी केली असता. महाडीक बंधूंनी दुकानापासून चारशे मीटर अंतरावरील विजेच्या खांबावरुन थेट बेकायदा वायर जोडून, कुल्फी दुकानासाठी विज वापरत असल्याची बाब पुढे आली. 

दरम्यान विज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने तांत्रिक बाबींचा अभ्यास केला असता, महाडीक बंधूंनी वर्षभराच्या काळात ८६५४ युनिट विज चोरुन वापरल्याचे पुढे आले. यामुळे विज वितरण कंपनीचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. या वीज चोरी बद्दल महाडीक बंधूंच्या विरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुसार लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती देतांना महावितरण कंपनीचे उरुळी कांचन विभागाचे वरीष्ठ अधिकारी प्रदीप सुरवसे म्हणाले, ''शिंदवणे परीसरातील महाडीक भावांनी कुल्फी दुकानासाठी वर्षभऱाहुन अधिक काळ चोरून विज वापरल्याचा प्रकार सहा महिण्यापुर्वी भरारी पथकाने उघड केला होता. महाडीक बधूंना तडजोड रक्कम भरण्यासाठी वेळ ही दिला होता. मात्र महाडीक बंधूंनी तडजोड रक्कम भरली नसल्याने, वरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT