पुणे : मी आमदार सुनील शेळके यांचा पीए आहे. मी तुम्हाला तीन हजार धान्याचे किट देतो, गाडीभाड्यापोटी मला पाच हजार रुपये ऑनलाइन पाठवा', असे सांगून एका ठगाने पुणे, शिरवळ, नाशिक, औरंगाबाद येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. विशेषतः जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याही नावाचा वापर करून तरुणाने अनेकांना फसविले असल्याचे आता उघड होऊ लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोरगरिबांना धान्याचे किट देण्यासाठी त्याला पैसे पाठविले, पण धान्याचे किट काही आले नाही. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आत्तापर्यंत सायबर गुन्हेगारांकडून बॅंक अधिकारी, विमा कर्मचारी, ई-वॉलेट कंपन्यांमधून बोलत असल्याचे भासवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार नवीन राहिले नाहीत. परंतु, आता थेट विद्यमान मंत्री, आमदार यांच्या नावाचा वापर करून, त्यांचे पीए, मीडिया मॅनेजर असल्याचे भासवून राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीच फसवणूक केली जात असल्याचा नवीन प्रकार पुढे आला आहे.
----------
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; आता घरोघरी होणार तपासणी
----------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून गोरगरीब किराणा, अन्नधान्य व अन्न वाटप केले जाते. बहुतांश राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील आता गरीब कुटुंबांना धान्याचे किट देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. नेमकी हीच संधी साधून औरंगाबाद येथील एका तरुणाने पदाधिकाऱ्यांशी व्हॉटसअप, फेसबुकद्वारे ओळख वाढविली. त्यानंतर त्यांना मंत्री, आमदारांसमवेत काढलेले फोटो दाखवून, त्यांच्याकडे काम करत असल्याचे सांगून पुणे, शिरवळ, औरंगाबाद येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे.
याविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पर्वती मतदार संघाच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संदीप काळे म्हणाले, ""अनिरुद्ध टेमकर अशा नावाच्या तरुणाने आमच्याशी फेसबुकद्वारे ओळख वाढविली. विधानसभा निवडणुकीनंतर त्याने आपण आमदार सुनील शेळके यांचे मीडिया मॅनेजर म्हणून काम पाहिल्याचे व सध्या त्यांचा पीए असल्याचे सांगत आमचा विश्वास संपादन केला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याने आमच्याशी संपर्क साधून गरिबांना वाटण्यासाठी धान्याचे किट देतो, असे सांगून आमच्याकडून ऑनलाईनद्वारे पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर तो पसार झाला. याप्रकरणी आम्ही आमदार शेळके यांची भेट घेऊन त्यांनाही घडलेला प्रकार सांगितला आहे. तसेच सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.''
"माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची एक तरुण माझ्याच नावाचा वापर करून त्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित तरुण कोण आहे, याविषयी मला माहिती नाही. परंतु त्याने केलेला प्रकार गंभीर आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. - सुनील शेळके, आमदार.
"या प्रकरणाची तक्रार आमच्याकडे आलेली आहे. तक्रारीची पडताळणी करून तपास प्रक्रियेला सुरूवात करण्यात येईल. - 'जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मिडीयाद्वारे होणाऱ्या गैरप्रकारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. असे असतानाही ठराविक पक्षांच्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या होत असल्याची सद्यस्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.