beauty_parlour 
पुणे

ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग देण्याच्या बहाण्याने महिलांना गंडवलं; विश्रांतवाडीतील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सरकारी योजना आणि सीएसआरनुसार मोफत ब्युटी पार्लर व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्यातून चांगला मोबदला देण्याच्या बहाण्याने ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने फिर्यादी महिला आणि इतरांची एक लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी अविनाश कळमकर (रा. अंबरनाथ) यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिंगरेनगर येथे राहणाऱ्या एका महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. मार्च २०१८ ते २० दरम्यान विश्रांतवाडीत हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरीब आणि गरजू मुलांना सरकारतर्फे अनुदान मिळवून सरकारी किंवा सीएसआर योजनेमधून मोफत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण द्यायचे आहे. त्याबदल्यात फिर्यादी यांना कामाचा चांगला लौकिक मिळेल. मी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ वोकेशन ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च सेंटर या संस्थेचा संचालक आहे, असे कळमकर याने फिर्यादी यांना सांगितले. त्यासाठी फिर्यादी आणि इतरांकडून ३५ हजार रुपये घेतले.

त्यानंतर प्रशिक्षण केंद्र सुरू करून फिर्यादी आणि इतर साथीदारांना प्रशिक्षण दिले. मात्र ठरल्याप्रमाणे फिर्यादी यांना या कामाचा मोबदला दिला नाही. त्याची मागणी केली असता आरोपीने टाळाटाळ केली. तसेच भलत्याच संस्थेचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे फिर्यादी आणि इतर महिलांनी आरोपीला दिलेले पैसे परत मागितले. मात्र आरोपीने ते देण्यास नकार दिला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. यादव करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT