free hotel quarantine facilities pune kothrud bjp initiative 
पुणे

कोथरूडकरांसाठी चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय; मोफत हॉटेल क्वारंटाइन सुविधा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील विशेषतः कोथरुड मतदारसंघातील कोरोनाबाधितांना आता मोफत हॉटेल क्वॉरंटाइनची सुविधा मिळणार असून, या ठिकाणी सर्व प्रकारच्या तपासण्यांसह जेवणाचीही सुविधा राहणार आहेत. पहिल्या टप्प्यातील लक्षणे नसलेल्या मात्र कोरोनाची लागण झालेल्या तीनशे रुग्णांची व्यवस्था राहणार आहे. या उपायासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांर घरीच राहून उपचार घेण्याचा (होम आयसोलेशन) सुविधा आहे. त्यात आतापर्यंत सुमारे सातशे रुगण घरीच आहेत. मात्र, छोट्या घरांतील रुग्ण आणि त्यांच्या नातवाईकांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर गरजु रुग्णांना दिलासा देण्यासाठी हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगतिले. त्यासाठी हॉटेल निश्चित करून आवश्यक त्या सुविधा उभारण्यात येणार आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

कोथरूड मतदारसंघातील लक्षणं नसलेल्या करोना बाधित (३००) रुग्णांसाठी हॉटेल मध्ये पुणे महानगर पालिकेच्या सहाय्याने वैद्यकीय तपासणी सुविधे सह नाश्ता, जेवण व राहण्याची व्यवस्था करणार. 
- चंद्रकांतदादा पाटील, आमदार , प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. 

जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली परवानगी
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'पुण्यातील करोना आजाराने बाधित रुग्णांची संख्या दिवसों दिवस वाढत चालली आहे. तशात शासकीय व्यवस्था तोकडी पडत असल्याने ज्या बाधित रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहे त्यांना घरीच उपचार घेण्याचे सांगत आहेत. पण, बहुसंख्य ठिकाणी एकाच किंवा दोन खोलीत कुटुंब राहत आहे. घर मोठे असूनही घरात लहान मुल म्हातारी माणसे आहेत. त्यामुळे घरच्यांना त्याची बाधा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रुग्ण घरी राहू शकत नाही किंवा घराचे तयार नाहीत त्याने काय करावे?  यावर उपाय म्हणून अश्या रुग्णांना घराबाहेर राहण्याची खाण्याची व वैद्यकीय तपासणीची सोय असलेली मोफत व्यवस्था हॉटेलमध्ये करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी परवानगी जिल्हाधिकार्यांकडे मागितली आहे आणि  ती लवकरच मिळेल हि अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टी, माझे सहकारी आणि मी गेल्या चार महिन्यांपासून आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी विविध मार्गाने जनतेला मदत करण्याचा सतत प्रयत्न करत आहोत. मी माझी सामाजिक बांधिलकीची जाणीव व समाजाचे ऋण उतराई होण्याच्या भावनेने अगदी सुरुवातीपासून मला योग्य वाटलेले, सुचलेले किंवा सुचवलेले उपाय, मदत शक्य होईल त्या पद्धतीने करत आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Latest Marathi News Updates : जालन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशी पीक गेलं पाण्याखाली

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

SCROLL FOR NEXT