lock down 
पुणे

आळंदीकरांनो, डरना जरुरी है....कोरोना आलाय वेशीपाशी! 

विलास काटे

आळंदी (पुणे) : आळंदीच्या वेशीवरील चऱ्होली- मोशी गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. मात्र, तरीही आळंदीत आज सकाळपासून जीवनावश्‍यक दुकानांबरोबरच इतर व्यापाऱ्यांचीही दुकाने प्रशासनाच्या मार्गदर्शनाने सुरू झाली. परिणामी रस्त्यावरील वाहतूक आणि दुकानदारांनी दुकाने उघडण्यास सुरू केलेली घाई पाहता आळंदीकरांना कोरोनाची भीती उरली नसल्याचे चित्र आहे. 

आळंदी पालिकेच्या हद्दीत सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे शहर ग्रीन झोनमध्ये आहे. त्यातून पालिका आणि पोलिस प्रशासनाने आजपासून जीवनावश्‍यक दुकानांबरोबर आणखी काही दुकाने सकाळपासून दुपारी दोनपर्यंत उघडण्यास परवानगी दिली. याचा परिणाम सकाळपासूनच कपडे, पुस्तके, झेरॉक्‍स, चप्पल व बूट विक्रेते, खेळणीवाले, सायकल, मोटार वाईंडिग, इलेक्‍ट्रीक इलेट्रॉनिक दुकाने आणि जीम उघडली होती. अनेक दिवस दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांनी दुकानांची साफसफाई केली. मालाची जुळवाजुळव केली. मात्र, हॉटेल, मिठाई, सलून, लॉज, चहाची दुकाने आणि मंदिरासमोरील प्रसाद विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. 

रस्त्यावर लोकांची वर्दळ आणि वाहनांची वर्दळ दिसून आली. कधी नव्हे ती मोकळीक मिळाल्याने नागरिकांना आनंद झाला होता. अधूनमधून पोलिस दुचाकीस्वारास अडवून कारवाई करत होते. मात्र, तरीही नागरिकांची रस्त्यावरील गर्दी काही कमी होत नव्हती. आळंदी गावठाण आणि देहू फाटा येथील स्थानिक नागरिक लॉकडाउनचे नियम पाळत आहेत. मात्र, महापालिका हद्दीतील चऱ्होली, डुडुळगाव भागातील व चऱ्होली खुर्द भागातील सोसायटीतील अनेक लोक रोजच खरेदीसाठी बाहेर पडत आहे. केळगाव, धानोरे गावातील लोक रोजच आळंदीत केवळ गप्पा मारण्यासाठी माउली मंदिरासमोरील एका बंद हॉटेलपुढे सकाळच्या सत्रात तासन्‌तास उभे असतात. पोलिस मात्र कोणतीच कारवाई करत नाही. कोरोना दारात आला तरी नागरिक बिनधास्त असल्याचे चित्र आहे. ग्रीन झोनमध्ये आळंदी असल्याने प्रशासनही निर्धास्त झाल्यासारखे वागत आहे. 

आळंदीच्या वेशीवरिल आणि पिंपरी महापालिका हद्दीतील मोशी- चऱ्होली गावात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आहे. या भागातून आळंदीत दररोज लोक येत असतात. मोशीसारख्या संवेदनशील भागात आळंदीतील शंभरहून अधिक भाजीविक्रेते आणि फळविक्रेते रोज रात्री खरेदीसाठी येजा करत आहेत. तसेच, दुसऱ्या दिवशी आळंदीत रस्त्यावर बसून भाजी विक्री करत आहे. तरीही त्यांची तपासणी अथवा त्यांच्यावर कारवाई पालिकेकडून केली गेली नाही. प्रशासन कोरोनाबाबत गांभीर्य दाखवत नसल्याचे चित्र आहे. 

रस्ते नावालाच सील 
पिंपरी पोलिस आयुक्तालयांच्या आदेशाने आळंदीतील चाकण चौक, इंद्रायणीनगर आणि देहू फाटा येथील रस्ते सील केले. मात्र, ते नावालाच सील आहेत. रस्त्यांवर बॅरिगेट असूनही नागरिक पर्यायी रस्त्याचा वापर करून मोशी, डुडुळगाव, चऱ्होलीत बिनधास्त येजा करत असल्याचे चित्र आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT