Pune_Police 
पुणे

ड्युटीच्या कारणावरून महिला पोलिसांमध्ये जुंपली; मुख्यालयातच 'फ्री स्टाईल' हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सायबर पोलिस ठाण्यातील मारहाणीचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी (ता.२१) सकाळी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. या घटनेची पुणे पोलिस दलात जोरदार चर्चा झाल्याने वरिष्ठांकडून संबंधीत प्रकरण गांभीर्याने लक्ष घातले आहे. 

संबंधीत प्रकरणातील दोन्ही महिला पोलिस पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. एक महिला पोलिस नाईक, तर दुसरी पोलिस शिपाई आहे. दोघीही नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी मुख्यालयामध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी ड्युटीच्या कारणावरुन दोघींमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघींनी एकमेकींना शिवीगाळ केल्याने त्याचे पर्यवसन भांडणामध्ये झाले. त्यावेळी पोलिस शिपाई कर्मचाऱ्याने पोलिस नाईक महिलेवर हात उचलला. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने तेथे बघ्यांची गर्दी जमली. त्यातूनच ही बातमी पोलिस दलात पोचून त्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली.

दरम्यान, महिला पोलिस कर्मचाऱ्यांमधील भांडणाचा हा प्रकार मुख्यालयाचे प्रभारी पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांच्यापर्यंत पोचला. त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन खात्याअंतर्गत चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या स्वरुपाचे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT