seven mantra1.jpg 
पुणे

'ॲग्रोवन- सेव्हन मंत्रा'च्या ताज्या भाज्या-फळे शनिवारीही घरपोच मिळणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या विशेष मागणी वरून 'ॲग्रोवन- सेव्हन मंत्रा'च्या वतीने येत्या शनिवारीही (ता. 25) भाजीपाला व फळे घरपोच दिली जाणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये 'ॲग्रोवन सेव्हन मंत्रा'च्या उपक्रमातून लाॅकडाउन मध्येही सुरक्षित आणि ताजा भाजीपाला लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला. शेतातून भाजी आणि फळे तोडण्यापासून ग्राहकांच्या घरी तो पोहोचवण्यापर्यंत सर्व प्रकारची सुरक्षा घेण्यात येत असल्याने भाजीपाला व फळांना मोठी मागणी आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भाजीपाला खरेदीसाठी बाहेर जाण्याचा धोका नको म्हणून नागरिकांनी आता शनिवारी ही भाजीपाला व फळे घरपोच पोहोचवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या शनिवारी आणि रविवारीही डिलिव्हरी दिली जाणार आहे. त्यासाठी  www.sevenmantras.com  या वेबसाईटवर आगाऊ नोंदणी करता येणार आहे. श्रावण महिन्यात लागणाऱ्या ताज्या भाज्या व फळे पुरवण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. या हंगामातील तसेच काही विदेशी फळे ही फळांच्या बास्केटमध्ये पुरवली जात आहेत.

राज्यात ठिकठिकाणी होणारा पाऊस आणि घटलेले उत्पन्न यामुळे भाजीपाला आणि फळांचे दर एका बाजूला वाढत असताना 'ॲग्रोवन सेवन मंत्रा'ने ग्राहकांना रास्त दरात दर्जेदार माल उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.

 

"अॅग्रोवन सेव्हन मंत्राने घर बसल्या भाज्या उपलब्ध करून दिल्यामुळे या लाॅकडाऊनमध्ये खूप मदत झाली. सर्व ताजा भाजीपाला वेळेत घरी मिळत असल्याने मी आणि आमच्या सोसायटीतील इतर सदस्यही तो नियमित घेत आहोत."

-  मोनिका एरंडोले, चिंचवड.

 

"भाजीपाला आणि फळांचा दर्जा, पॅकिंग उत्तम आहे. सर्वात महत्त्वाचे कोरोनाचे वाढते प्रमाण असल्याने बाहेर जावे लागत नाही. सर्व काळजी घेतली जाते." 

- अपूर्वा देशमुख, सिंहगड रोड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT