murder sakal
पुणे

दारू पिण्यासाठी एकत्र बसल्यानंतर झालेल्या वादातून मित्राने केला मित्राचा खून

बिबवेवाडीतील महेश सोसायटी चौकातील राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये हा खून झाला होता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दारू पिण्यासाठी एकत्र बसल्यानंतर झालेल्या वादातून मित्रांचा खून (Murder)करून पसार झालेल्या एकाला बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police Station)अटक केली आहे. बिबवेवाडीतील महेश सोसायटी चौकातील राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये हा खून झाला होता.

दत्तात्रेय चंद्रकांत सकट (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खून झालेल्या तरुणाच्या डोक्यात कशाने तरी मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तपासात हा मृतदेह आड्या ऊर्फ विशाल भीमराव ओव्हाळ (वय २६, रा. पद्मावती) याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत मंगळवारी (ता. ११) रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत विशालचे चुलते गणेश ओव्हाळ (४६, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.(Pune Crime News)

तांत्रिक विश्लेषावरून बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने माहिती घेतली असता हा खून त्याच्या जवळचा मित्र चंद्रकांत याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शोध घेतला असता तो इंदिरानगर परिसरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. तेथून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानेच हा खून केल्याचे तपासात सांगितले. दारू पिण्यास एकत्र बसले असताना यावेळी झालेल्या वादातून हा खून केल्याचे त्याने सांगितले. खूनाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

पहिल्यांदाच सासू आणि नणंदेसोबत दिसली दीपिका पादुकोण; सासरच्यांसोबतचं वागणं पाहून नेटकरी चकीत

SCROLL FOR NEXT