fti.jpg 
पुणे

'एफटीआयआय'च्या ग्रंथालयाचं नामकरण; आता 'या' नावाने ओळखले जाणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) ग्रंथालय आता "गजानन जागीरदार ग्रंथालय' म्हणून ओळखले जाणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेते आणि संस्थेचे पहिले संचालक असणाऱ्या जागीरदार यांच्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात येत आहे. 

"एफटीआयआय'मधील ग्रंथालय हे चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील संदर्भ साहित्याचा खजिना म्हणून ओळखले जाते. ग्रंथालयात या क्षेत्राशी संबंधित जवळपास 30 हजारांहून अधिक पुस्तके आणि चार हजारांहून अधिक ध्वनी आणि ध्वनिचित्रफीत अशी विस्तृत संपदेचा संग्रह आहे. त्याशिवाय अनेक दुर्मिळ मासिके, पुस्तकांचा ठेवा ग्रंथालयात जपलेला आहे. जगभरात 1930मध्ये प्रकाशित झालेली दुर्मिळ मासिकांचा या ग्रंथालयात संग्रह करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक भूपेंद्र कैंथोला यांनी दिली. 

जागीरदार यांचा येत्या गुरुवारी (ता.13) स्मृतिदिन असून, त्यांचे औचित्य साधून ग्रंथालयाचे अधिकृत नामकरण करण्यात येणार आहे. यावेळी जागीरदार यांचे सुपुत्र अशोक जागीरदार, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, दिग्दर्शक सतीश आळेकर, संस्थेचे संचालक भूपेंद्र कैंथोला, संस्थेच्या दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता आर. एन. पाठक, फिल्म्स विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

जागीरदार यांचा जन्म अमरावती येथे 2 एप्रिल 1907 मध्ये जन्म झाला होता. ते संस्थेचे पहिले प्राचार्य (प्रशासकीय प्रमुख) होते. सध्या संस्थेचे संचालक म्हणून असणारे पद हे त्याकाळी प्राचार्य म्हणून होते. जागीरदार यांनी प्रभात फिल्म कंपनीसमवेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरवात केली. "रामशास्त्री' चित्रपटातील त्यांची "रामशास्त्री' ही भूमिका त्याकाळात विशेष गाजली. शेजारी, महात्मा, छोटा जवान, गाइड, हम दोनो, अपराधी कौन, इक्तफाक या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. संस्थेतील ग्रंथालयाचे नामकरण त्यांच्या स्मृतिदिनी होणार असल्याचे कैंथोला यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT