Fuel prices
Fuel prices  
पुणे

वाहनचालकांना दिलासा! गेल्या दहा दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या सततच्या इंधन दरवाढीला गेल्या दहा दिवसांपासून ब्रेक लागला आहे. सतरा जुलैपासून मंगळवारपर्यंत (ता. २७) इंधनाचे दर जैसे थे आहेत. दरवाढ न झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्यावर्षी अनलॉकनंतर इंधनाचे दर सातत्याने वाढते होते. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये दर काहीसे कमी झाले. डिसेंबर २०२० पर्यंत दर कमी जास्त होत होते. मात्र जानेवारीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. १५ एप्रिल ते १५ जुलै या तीन महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे दर एकदाही कमी झालेले नाहीत. त्यामुळे दरवाढीपासून कधी मुक्तता होणार या चिंतेत असलेल्या वाहनचालकांना गेले दहा दिवस काहीसे दिलासादायक ठरले आहेत. दरवाढ सुरूच राहिली असती तर साधे पेट्रोल ११०, पॉवर पेट्रोल ११५ आणि डिझेल १०० रुपयांच्या घरात गेले असते.

इंधनाचे दर

१ जुलै

पेट्रोल - १०४.८८

पॉवर पेट्रोल - १०८.५६

डिझेल - ९४.८८

सीएनजी - ५६.६० प्रतिकिलो

२७ जुलै

पेट्रोल - १०७.४५

पॉवर पेट्रोल - १११.१३

डिझेल - ९५.६०

सीएनजी - ५६.६० प्रतिकिलो

''कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेले नागरिक खर्चाचा मेळ कसा घालायचा या चिंतेत आहेत. त्यांच्या टेन्शनमध्ये इंधन दरवाढीची भर पडत होती. त्यामुळे दर स्थिर आहेत हे चांगले आहे. मात्र पुढे ते कमी होणे अपेक्षित आहे. कर मिळण्यासाठी सरकारने केवळ इंधनावर अवलंबून राहू नये.''

- राहुल शिंदे, दुचाकीधारक

''इंधनाचे दर वाढले नाहीत ही एक सकारात्मक बाब आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्याबाबतच्या आवश्‍यक त्या बाबी सध्या सुरू आहेत. त्यामुळे लवकरच वाहनचालकांना दिलासा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update: ...तर मोदींबरोबर गेलेलं का चालत नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT