Oxygen
Oxygen Sakal
पुणे

महाराष्ट्रातील उद्योजकांबरोबरच पाच राज्यांतून निधीचे पाठबळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ऑक्सिजन, (Oxygen) व्हेंटिलेटर (Ventilator) आदींचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘मिशन वायू’तंर्गत (Mission Vayu) उद्योगांनी पुढाकार घेऊन, तब्बल १०० कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे (Medical equipment) शासकीय आणि खासगी रुग्णालयांना अवघ्या दहा दिवसांत उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा फायदा लाखो रुग्णांना होत आहे. त्यातील सुमारे ३५ कोटींचा निधी (Fund) राज्यातील उद्योगांनी (Business) उभारला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये या उपकरणांचे वितरण सध्या सुरू आहे. (Fund support from five states along with entrepreneurs from Maharashtra)

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) समन्वयातून निर्माण झालेल्या ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’ने (पीपीसीआर) यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्याबाहेर त्यांना एसीटी ग्रॅंटस आणि स्वास्थ अलायन्स या संघटनांनी मदत केली. त्यातून ‘मिशन वायू’ हा उपक्रम सुरू झाला आहे. देशातील एक हजारपेक्षा जास्त उद्योग कंपन्या, उद्योजक आणि नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने निधीसाठी मदत केली. त्यातून अवघ्या १० दिवसांत सुमारे १०० कोटी रुपयांची उपकरणे उपलब्ध झाली आहेत. देशातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता, पीपीसीआरने सिंगापूरमधील टेमासेक फाऊंडेशनशी संपर्क साधला. त्यांनी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सवलतीमध्ये उपलब्ध करून दिले तर, तर एअर इंडियाने वाहतुकीसाठी मदत केली. तसेच ॲमेझॉन इंडियाने या उपकरणांची देशातील वाहतूक मोफत केली. ओलम इंटरनॅशनल, केरी लॉजिस्टिक्स यांनीही मिशन वायूला मदत केली.

मिशन वायूतंर्गत कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या सहा प्रमुख राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वैद्यकीय उपकरणे पोचविण्यात आली. ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणेला मर्यादा आहेत, त्या ठिकाणी उद्योगांनी पुढाकार घेतला.

कोरोनाची स्थिती गंभीर आहे म्हणून चिंताक्रांत होण्यापेक्षा काही तरी पावले उचलली पाहिजेत, या भूमिकेतून पीपीसीआरच्या माध्यमातून ‘मिशन वायू’ सुरू करण्यात आला. पुण्यातील उद्योगांनी तसेच राज्यातील आणि बाहेरील उद्योग समूहांनीही त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे अल्पावधीत १०० कोटींची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करता आली.

- सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए आणि मुख्य समन्वयक - पीपीसीआर

उपलब्ध केलेली उपकरणे

  • ७८०० - ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

  • ८७५ - बायपॅक व्हेंटिलेटर

  • ५० - हजार ऑक्सिमीटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT