पुणे

प्रत्येक वनधन केंद्राला वीस लाख रुपये निधी : सविता चकवे-डुंबरे

डी. के. वळसे पाटील

मंचर : आदिवासी डोंगराळ भागातील अनुसूचीत जमातीच्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ व  केंद्रीय जनजाती केंद्रीय मंत्रालय (ट्रायफेड) यांच्या मार्फत पंतप्रधान वनधन योजनां प्रभावीपणे राबविली जात आहे. त्यासाठी आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात एकूण १४ वनधन केंद्र मंजूर झाली आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पंतप्रधान वनधन विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वनधन केंद्राला प्रशिक्षणासाठी पाच लाख रुपये निधी, गौणवनउपज खरेदीसाठी पाच लाख रुपये निधी व फिरते भागभांडवल १० लाख रुपये असे एकूण 20 लाख रुपये निधी प्राप्त होणार आहे, असे शबरी आदिवासी विकास महामंडळ जुन्नरच्या शाखा व्यवस्थापक सविता चकवे-डुंबरे यांनी सांगितले.

डिंभे (ता. आंबेगाव) येथे  प्रशिक्षण कार्यक्रमात चकवे-डुंबरे बोलत होत्या. यावेळी वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी अर्चना क्षिरसागर, प्रशिक्षक विजय सांबरे, सारंग पांडे, गौरव काळे, मनिषा जरकड, अमोल केदारी, संदेश पवार, मंगेश उनकुले उपस्थित होते.

चकवे-डुंबरे म्हणाल्या “गोहे बुद्रूक, गोहे खुर्द, चपटेवाडी, कानसे, डिंभे या भागातील वनधन केंद्रामार्फत वावडिंग, हिरडा,  बेहडा, मध, चिंच या गौणवनउपजवार प्रक्रिया करून उद्योग उभारले जाणार आहे. त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.”

शबरी वित्त जुन्नर शाखा कार्यालयाअंतर्गत १५ बचत गटांचे एक वनधन केंद्र स्थापन केले आहे. बचत गटांना उद्योजकता, रोजगार, मालाची निवड, पॅकिंग व आर्थिक व्यवहार यांचे प्रशिक्षण टाटा इन्स्टीट्यूट आॅफ सोशल सायन्स यांचेमार्फत महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत उभारलेल्या वनधन केंद्रांना दिले जात आहे.-सविता चकवे-डुंबरे, शाखा व्यवस्थापक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा जुन्नर.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT