Gajanan_Marne
Gajanan_Marne 
पुणे

गुंड गजा मारणेसह 9 जणांना कोथरुड पोलिसांकडून अटक; 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे सोमवारी (ता.१५) सायंकाळी मुंबईतील तळोजा करागृहातून सुटल्यानंतर त्याच्या गुंड समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढीत शक्तिप्रदर्शन केले. गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण होत असल्याचे लक्षात येताच पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह त्याच्या 200 साथीदाराविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.१६) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मारणेसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली, तर गुन्हा दाखल झालेल्यापैकी 27 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलिसांच्या या कारवाईने गुंडांची चांगलीच धावपळ उडाली.

मारणे याला दोन खून प्रकरणात २०१४ मध्ये अटक झाली. त्यानंतर त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली होती. त्याला नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. दरम्यान, दोन्ही खून प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी त्याच्या हजारो समर्थकांनी तळोजा कारागृहासमोरच मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत आरडाओरड केला. फटाके फोडण्याबरोबरच ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरणही केले. चित्रीकरण करीतच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन 400 ते 500 अलिशान गाड्यांमधून जंगी मिरवणूक काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील व्हिडीओ काही वेळातच सोशल मिडीयावर व्हायरल झाले. 

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून पहिल्यांदा गुन्हा दाखल 
मारणे याच्या समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे मारणे याच्या समर्थकांनी बेकायदेशीर जमाव जमवून फटाके वाजवत दहशतीचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांवर शिरगाव चौकीत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एक ड्रोन कॅमेराही जप्त केला आहे. उर्से टोल येथे फटाके वाजवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. या संपूर्ण प्रकाराचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्याच्या मागे आणि पुढे शेकडो मोटारींचा ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झाला. मारणे आणि त्याच्या साथीदारांवर कलम १८८, १४३, २८३, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ फौजदारी कायदा कलम ७ प्रमाणे शिरगाव चौकीत गुन्हा दाखल केला आहे.

पुणे पोलिसही झाले सक्रिय
पिंपरी-चिंचवड पोलिसांपाठोपाठ पुणे पोलिसांनीही या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. मारणे आणि त्याचे साथीदार रात्री कोथरुड येथे दाखल झाल्यानंतर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तेथेही बेकायदा गर्दी जमवून फटाके वाजविणे, आरडाओरडा करणे आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच मारणेच्या हजारो समर्थकांनी जंगी स्वागताचे स्टेटस व्हॉटसअपवर ठेवत 'महाराष्ट्राचा किंग' असा उल्लेख करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकाराची पोलिसांनी दखल घेत मारणे याच्यासह दीडशे जणांवर सुरक्षित अंतर न पाळणे, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथ रोग प्रतिबंधक कायदा अशा वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारणेसह नऊ जणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. 200 जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यापैकी 27 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.

तळोजा येथील घटनेचीही होणार चौकशी

तळोजा कारागृहातून गँगस्टर गजा मारणे सुटल्यानंटर तो कारागृहाच्या एका प्रवेशद्वारातून मोटारीतून बाहेर येत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच, त्या मोटारीत अनेकजण बसल्याचे दिसत आहे. गेटजवळ मोठी गर्दी जमा झाली होती. या सर्व प्रकाराची कारागृहाच्या दक्षिण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांना चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कारागृहाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी दिली.

"गजा मारणेसह त्याच्यासोबत असणाऱ्यांवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मारणेसह काही जणांस अटक केली आहे. अशा घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्या सुरक्षेबाबत पुणे पोलिस कटिबद्ध आहेत."
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

गुंड शरद मोहोळवरही गुन्हा दाखल
खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात बेकायदा जमाव गोळा करणे व इतर कायद्यानुसार गँगस्टर शरद मोहोळ याच्यासह दहा ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT