Ganesh Chaturthi 2023 changes in pune transport traffic pune know which route is open for transport parking sakal
पुणे

Ganesh Chathurthi 2023 : गणेश प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

गणेश प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त १८ आणि १९ सप्टेंबर रोजी शहराच्या मध्यभागात वाहतुकीत बदल करण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेश प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त १८ आणि १९ सप्टेंबर रोजी शहराच्या मध्यभागात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौकापासून गोटीराम भैय्या चौकापर्यंत मार्ग वाहतुकीस बंद राहील.

शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरात गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कसबा पेठेतील डेंगळे पूल ते शिवाजी पूल, कसबा पेठ पोलिस चौकीपासून जिजामाता चौक ते मंडईपर्यंत तसेच,

सारसबाग परिसरातील सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात वाहतूक व्यवस्थत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. शिवाजी रस्ता - गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक परिसर वाहतुकीस बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग -

- वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

- शिवाजीनगरकडून संचेती चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

- सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू राहील, परंतु या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत.

वाहतूक सुरु असलेले रस्ते :

या मार्गांवरून वाहनांसाठी (जड वाहनांना प्रवेश बंदी) एकेरी वाहतूक सुरु राहील.

- फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज

- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक

- सोन्या मारुती चौक से बेलबाग चौक ते सेवासदन चौक

- मंगला चित्रपटगृहासमोरील प्रिमीयर गॅरेज लेनमधून कुंभारवेस

पार्किंग व्यवस्था :

- मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझापर्यंत

- जमनालाल बजाज पुतळा ते पूरम चौक रस्त्याचे डाव्या बाजूस

- नीलायम पूल ते सिंहगड रस्ता जंक्शन

- कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळादरम्यान रस्त्याच्या एका बाजूस

- वीर संताजी घोरपडे पथावर मनपा बिलभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक रस्त्याच्या दक्षिण बाजूस

- टिळक पूल से भिडे पुलादरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर

- मंडई येथील मिनर्व्हा आणि आर्यन वाहनतळावर

- शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौक रस्त्याच्या डाव्या बाजूस

- पीएमपी बसेसच्या मार्गांत बदल :

- शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

- पीएमपी बसेस स. गो. बर्वे चौकातून शिवाजी पुलाऐवजी जंगली महाराज रस्त्याने टिळक चौकातून स्वारगेटकडे जातील.

- महापालिकेकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस झाशीराणी चौकातून जंगली महाराज रस्त्याने टिळक चौकातून शास्त्री रस्त्याने जातील.

जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी

पुणे : गणेशोत्सव काळात शहरातील मध्यवर्ती भागात सोमवार (ता. १८) पासून गणेश विसर्जनापर्यंत जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहील.

- लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक ते टिळक चौक

- केळकर रस्ता - फुटका बुरुज ते टिळक चौक

- कुमठेकर रस्ता- शनिपार ते टिळक चौक

- बाजीराव रस्ता- पूरम चौक ते गाडगीळ पुतळा

- टिळक चौक - जेधे चौक ते टिळक चौक

- शास्त्री रस्ता- सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक

- कर्वे रस्ता- नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक

- फर्ग्युसन कॉलेज रस्ता- खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक

- जंगली महाराज रस्ता- स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक

- शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT