Ganesh Chaturthi 2023 msrtc 3500 buses deployed from pune to konkan 150 bus sakal
पुणे

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवासाठी ३५०० एसटी; पुण्यातून कोकणात १५० बस

२३५० गाड्यांचे आरक्षण पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गर्दीचा विचार करता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोकणासाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यंदा सुमारे ३५०० एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत.

यातील सुमारे २३५० गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. तसेच स्वारगेट बस स्थानकावरून सुमारे दीडशे बस सोडण्यात येणार आहेत. महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत असल्याने यंदाच्या वर्षी एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात भक्त कोकणातील आपल्या मूळ गावी जातात. ही संख्या मोठी असल्याने प्रवासी रेल्वे, एसटीसह खासगी गाड्यांचा आधार घेतात. एसटी प्रशासनाने देखील याचे नियोजन केले असून विविध आगारातून गाड्या मुंबईसाठी सोडल्या जाणार आहेत.

एसटी मुंबईत पोचल्यावर कोकणातील विविध गावांसाठी एसटी धावतील. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आधीपासूनच सीटचे आरक्षण केले आहे. यात ऑनलाइन आरक्षण ते समूह आरक्षणाचा समावेश आहे.

त्यामुळे ऑगस्टमध्येच साडेतीन हजार पैकी २३५० बसचे आरक्षण झाले आहे. उर्वरित गाड्यांचे काही दिवसांत आरक्षण होण्याचा अंदाज आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे.

हे लक्षात घेऊन पुणे विभागाने सुमारे १५० एसटी गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. गणेश प्रतिष्ठापनेच्या आधी दोन दिवस पुण्यातून रत्नागिरी, कणकवली, चिपळूण आदी मार्गांवर गाड्या सोडल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT