ga.jpg 
पुणे

पुण्यात "बाप्पा आपल्या घरी" उपक्रमाव्दारे सोसायटीमध्ये मिळणार गणेश मूर्ती

सकाळवृत्तसेवा

घोरपडी : पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे पण वाढत्या संसर्गामुळे हा उत्सव अगदी सध्या पद्धतीने करावा लागणार आहे. बाहेर जावं तर गर्दी मग उत्सव साजरा करायचा कसा असा अनेकांना प्रश्न पडला आहे. यासाठी एकलव्य प्रतिष्ठान माध्यमातून "बाप्पा आपल्या घरी" हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये नागरिकांना त्यांच्या सोसायटी व कॉलनीमध्ये गणेश मूर्ती खरेदी करता येणार आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत मिळेल. 

एकलव्य प्रतिष्ठानने या उपक्रमा अंतर्गत एका टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये विविध गणेश मूर्ती ठेवल्या आहेत. ७० टक्के शाडूच्या मूर्ती सोबत इतर मूर्ती पण आहेत. एक फूट किंवा त्यापेक्षा लहान मूर्ती असल्याने ५० ते ६० मूर्ती टेम्पोमध्ये आकर्षक पद्धतीने ठेवल्या आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या दारातच गणेश मूर्तीची खरेदी करता येणार आहे. तसेच यावेळी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन केले जात आहे. यासाठी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोबत सामाजिक अंतर जपत मूर्ती पाहण्यास एका वेळी एकच व्यक्तीस टेम्पो मध्ये प्रवेश दिला जात आहे.

मागील तीन दिवसांपासून वानवडी मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला असून आतापर्यंत ५० नागरिकांनी मूर्तीची बुकिंग केली आहे. तर काहींनी श्री ची मूर्ती खरेदी केली आहे.  बाजारात मिळणाऱ्या मूर्तीच्या किंमती पेक्षा कमी किंमत असल्याने याला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. 

कोरोनाच्या या महामारीमध्ये वानवडी मधील नागरिकांना बाहेर न जाता आपल्या दारात गणेश मूर्ती खरेदी करता यावी म्हणून हा उपक्रम राबविला आहे. सध्या बुकिंग करून गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री ची मूर्ती मोफत घरपोच देणार आहोत. कोरोना पासून बचाव करण्यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. या उपक्रमामुळे नक्कीच गर्दी टाळणे शक्य होणार आहे.-प्रफुल्ल जांभूळकर, एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: मुंबईत ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2’चे उद्घाटन; देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम’च्या विचारातून जगाला सहकार्याची नवी दिशा

Hartalika Ganesh Chaturthi : यंदा एकाच दिवशी हरतालिका, गणेशोत्‍सव, तब्‍बल २६ वर्षांनंतर आला योग; यावर्षी १२ दिवसांनी उत्सवाची सांगता

Solapur शाळा बांधली, पण पोहोचायचं कसं? वाटच नाही, चिमुरड्यांचे अनोखे आंदोलन

Marathi News Live Updates: आरएसएस बंगालमध्ये स्वत:ची शिक्षण पद्धती का आणतात?, संजय राऊतांचा सवाल

जगाचा नकाशा बदलणार; आफ्रिका दिसणार मोठा, युरोप-अमेरिकेचा आकार होणार कमी, भारताचा ठरावाला पाठिंबा?

SCROLL FOR NEXT