ganesh jayanti 2021 traffic route changes pune city 
पुणे

पुणेकरांनो महत्त्वाची बातमी : गणेश जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त सोमवारी (ता.15) शिवाजी रस्ता परिसरातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरासह अन्य गणपती मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सोमवारी शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे, त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोठे कसे जाल?

  • शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे) जंगली महाराज रस्त्याने डेक्कन, टिळक रस्ता मार्गे स्वारगेटच्या दिशेने जावे
  • स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून इच्छित स्थळी जावे
  • अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणारा रस्ताही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
  • लक्ष्मी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हमजेखान चौकातून वळून कस्तुरे चौकमार्गे स्वारगेटकडे जावे.
  • लक्ष्मी रस्त्यावरुन टिळक चौकाकडे (अलका टॉकीज) जाणाऱ्या वाहनचालकांनी सोन्यामारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौक, जिजामाता चौक, फुटका बुरुज, महापालिकामार्गे झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जावे.
  • बाजीराव रस्त्याने महापालिकेकडे जाणारी वाहतूक गर्दी वाढल्यास टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून वळविण्यात येईल. वाहनचालक टिळक रस्त्याने खंडोजीबाबा चौकात जातील.

वाहतुकीतील बदलाची दखल घेऊन वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT