Uddhav Thackeray_Aanand Dighe
Uddhav Thackeray_Aanand Dighe 
पुणे

उद्धव ठाकरे, आनंद दिघेंच्या फोटोची चर्चा; अलका चौकात झळकला बॅनर

सकाळ डिजिटल टीम

पुणे : Pune Ganesh Visarjan 2022 : पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावरील अलक चौकात झळकलेल्या एका बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवसेनेचा हा बॅनर असून यावर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यातील मजकूरही लक्षवेधी आहे. (Ganesh Visarjan 2022 Uddhav Thackeray Anand Dighe photo appeared in banner at Pune Alka Chowk)

काय म्हटलंय बॅनरमध्ये?

"माझा कट्टर शिवसैनिक आनंद दिघे" हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य तसेच "माझी जात-गोत्र-धर्म फक्त शिवसेना" हे दिवंगत आनंद दिघे यांचं वाक्य. अशी दोन कोट्स अर्थात अवतरण या बॅनरवर आहेत. तसेच "मा. उद्धवजी, अखंड महाराष्ट्र सदैव आपणासोबत" असा मथळा याला देण्यात आला आहे. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी हा बॅनर लावला आहे.

ShivSena Banner

एकनाथ शिंदेंमुळं उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं

दरम्यान, शिवसेनेत मोठी फूट पडल्यानं सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेतील या बंडाचे सूत्रधार तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते. उद्धव ठाकरेंचं सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. शिवसेनेतील फुटीमुळं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट पडले असून शिंदेंच्या बॅनरवर आता बाळासाहेब ठाकरेंसह केवळ आनंद दिघेंचा फोटो असतो. पण आता पुण्यातील या बॅनरमुळं नवी चर्चा सुरु झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT