Ganpati-Making 
पुणे

घरच्या घरी गणेश मूर्ती तयार करुन पूजन करावे : पंचांगकर्त्यांचे आवाहन

सकाळवृत्तसेवा

पुणे - आपल्या लाडक्या 'बाप्पा'च्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असल्याने घरोघरी गणेशोत्सवाची चर्चा ऐकू येत आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढत असताना बाजारपेठेत गणेश मूर्ती मिळणार का!  'बाप्पा'च्या मूर्तीचे विसर्जन नदीत, हौदात करायला मिळेल का! अशा असंख्य प्रश्न डोकवत आहेत का, मग जरा हे वाचा. यावर्षी बाजारात गणेश मूर्ती मिळाली नाही, तर स्वतः माती आणून लहान जमेल तशी मूर्ती तयार करावी किंवा धातूच्या मूर्तीचे पूजन करावे. या मुर्तीचे घरच्या घरी विसर्जन करावे, म्हणजे विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळता येईल, असे नामांकित पंचागकर्त्यांनी सूचविले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाद्रपदात गणपतीच्या मूर्तीचे महत्त्व असल्यामुळे मातीच्या गणपतीच्या मुर्तीचे पूजन करावे. यावर्षी बाजारात मूर्ती मिळाली नाही तर स्वतः माती आणून लहान मूर्ती आपल्याला जमेल तशी तयार करावी. उत्सव मूर्ती ही धातूची असली तरी चालते. कारण मुख्य पूजन किंवा प्रत्यक्ष विसर्जन त्या धातूच्या मूर्तीचे नसते, ती वर्षानुवर्षे तशीच वापरता येते. आपण बनवलेल्या मृत्तिका मूर्तीचे पाण्यात विसर्जन करावे लागते. आपण बनवलेली मूर्ती छोटीच असल्यामुळे तिचे विसर्जन एखाद्या बादलीत शुद्ध पाणी घेऊन त्यात विसर्जन करून माती विरघळल्यावर ते पाणी घरातल्या कुंड्यामधे सुद्धा टाकता येते. कित्येक गावात वाहती नदी नसल्यामुळे अशी विसर्जनाची पद्धत अधिक सोयीची होऊ शकते, असे केल्याने विसर्जन स्थळी देखील गर्दी टाळता येईल, असा सल्ला पंचागकर्त्यांनी दिला आहे.

मोहन दाते (दाते पंचांग), जयेंद्र साळगांवकर, विद्याधर करंदीकर (कालनिर्णय पंचांग), श्रीमति विद्या राजंदेकर (महाराष्ट्रीय पंचांग), दा. कृ. सोमण (निर्णयसागर पंचांग) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव शास्रशुद्धपणे कसा साजरा करण्यात यावा, हे सांगितले आहे.

बाजारात मूर्ती न मिळाल्यास याप्रमाणे गणेश उत्सव करता येईल. आजही कित्येकजण स्वतः मूर्ती तयार करून उत्सव करतातच आहेत. तसे शास्त्रात सुद्धा सांगितले आहे. पूर्वीच्या काळी बाजारातून मूर्ती आणत नव्हते, जमेल तशी घरीच तयार करुन पूजन करीत होते, घरी बनविलेली मूर्ती पाच ते दहा दिवस टिकेल असा पदार्थ त्यामध्ये न घालता मूर्ति केली असेल तर या वर्षी दीड दिवस गणेशोत्सव करावा. दीड दिवसाचा गणेशोत्सव केल्यावर देखील परंपरे प्रमाणे महालक्ष्मी / गौरी आवाहन-पूजन करता येते.

बाजारात मूर्ती मिळत असेल तर साधारणपणे एक वीतभर उंचीची मूर्ती पूजेसाठी घ्यावी आणि गणेशोत्सव नेहमी प्रमाणे करावा. ही मूर्तीसुद्धा माती किंवा शाडूची घेण्यासाठी आग्रही असावे. तसेच ही मूर्ती आठ-दहा दिवस आधी पण घरी आणून ठेवता येते. गणेश मूर्ती एक दिवस आधी किंवा त्याच दिवशी आणली पाहिजे असे नाही,असे दाते यांनी सांगितले.

अनेकजण दरवर्षी उत्सवासाठी आपल्या गावी जातात. यावर्षी त्यांना गावी जाणे शक्य नसल्यास त्यांनी राहत्या घरी वरीलप्रमाणे गणेशोत्सव करून आपली गणेशपूजनाची परंपरा अखंडित ठेवावी. यावर्षी कोरोना संकटामुळे अनेक बदल आपण अंगीकारले त्याप्रमाणे गणेश उत्सवात सुद्धा आपणास बदल करावा लागणार असल्याचे पंचागकर्त्यांनी नमूद केले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Latest Maharashtra News Updates : धुळे बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

SCROLL FOR NEXT