पुणे

Pune: गणेशखिंड रस्त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष; खड्डे, धुळीच्या समस्येने वाहनचालक हैराण

Latest Pune News: बंद पडलेल्या वाहनामुळे वाहतूक संथ होऊन, दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात.

समाधान काटे

समाधान काटे

Latest ShivajiNagar News : शिवाजीनगर येथील गणेशखिंड रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे. धुळीचे प्रमाणही वाढल्याने वाहनचालकांना कसरत करून वाहन चालवावे लागते. खडीवरून घसरून अनेक दूचाकींचे अपघात झाले आहेत. कॅासमॅास बॅंक ते सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक या रस्त्याची अत्यंत दैनीय अवस्था झाली आहे.

जागोजागी खड्डे पडल्याने, पाऊस पडल्यावर वाहनचालकांना खड्डयांचा आंदाज येत नाही, त्यामुळे अनेक दूचाकी खड्यात पडल्यावर बंद पडतात. बंद पडलेल्या वाहनामुळे वाहतूक संथ होऊन, दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात.

याचा फटका प्रवाशांना बसतो, वेळेत पोहचता येत नाही. रस्त्यवरची धूळ वाहनचालकांच्या डोळ्यात, नाकात, तोंडात जाऊन प्रवाशांना श्वासनाचे आजार होतात. कित्येक महिन्यापासून प्रवसी वरिल समस्यांना तोंड देत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त प्रवासी, स्थानिक रहिवासी सुहास अनगळ यांच्यासह इतर रहिवाशांनी 'सकाळ'कडे कैफियत मांडली.

चिखल तुडवत पादचाऱ्यांचा प्रवास

कॅासमॅास बॅंक ते सेनापती बापट रस्ता या मार्गवर पदपथ शिल्लक राहिला नाही. रस्त्याच्या बाजूला सिंमेटचे ब्लॅाक, कचरा, माती, राडारोडा, केबल, झाडांच्या फांद्या, खडी पसरलेली आहे. या ठिकाणी नियमित सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पादचारी मार्ग शिल्लक रहिला नसल्याने विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिकांना रस्त्याच्या बाजूने चिखल तुडवत चालावे लागते.

"सांडपाणी (ड्रेनेज)ची झाकणं खराब झाल्याने रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहते. कॅासमॅास बॅंकेच्या समोर वळणावर वॅार्डन सोबत कायम स्वरूपी वाहतूक पोलिस असावा. रस्यावर पडलेले खड्डे तात्काळ दूरूस्त करावे, पादचारी मार्गचे काम मार्गी लावावे.या मार्गावरून लहान बस सुरू केल्या तर वाहतूक कोंडी कमी होईल.

- संजय जाधव, अध्यक्ष चतुःशृंगी नागरिक कृती समिती

"प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतीनिधींचे या भागाकडे लक्ष नाही. खड्डे, वाहतूक कोंडीमुळे येथील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनगळवाडी येथील पाच ते सहा हजार नागरिकांना याचा फटका बसतो.

- भगवान देशपांडे, अध्यक्ष चतु: र्शुंगी मित्र मंडळ ट्रस्ट

" मेट्रोच्या आजूबाजूचे काम करण्याची जबाबदारी मेट्रोची आहे. सध्या मेट्रोचे काम जोरात सुरू असल्याने क्रेन, गार्डर यामुळे रस्त्यावर खड्डे पडतात. याकडे मेट्रो अजिबात लक्ष देत नाही. पदपथाचे काम मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचना देतो."

- अनिरूद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथ विभाग महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT