नातूबाग, बाजीराव रस्ता - रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत गणेशभक्तांनी रविवारी देखावे आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 
पुणे

गणेशोत्सव2019 : गणरायाच्या उत्सवाला उधाण

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विघ्नहर्त्या गणरायाचे देखावे पाहण्यासाठी रविवारी दुपारपासून पुण्यनगरीतील रस्त्यारस्त्यांवर भाविक मोठ्या संख्येने आले. ‘मोरया... मोरया...’च्या जयघोषामुळे वातावरण गणेशमय झाले. संध्याकाळी पावसाने उघडीप दिली. हवेत मंद गारवा होता. अशा प्रसन्न वातावरणात लक्ष-लक्ष दिव्यांच्या लखलखाटात पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाला उधाण आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. परंतु, त्याचा परिणाम गणेशभक्‍तांवर झाला नाही. रात्री उशिरापर्यंत भाविक देखावे पाहण्यात गुंग होते. 

गौरी आणि घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. त्यानंतर रविवारच्या सुटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी संध्याकाळी पुणेकर घराबाहेर पडले. दुपारनंतर पेठांमध्ये गर्दी वाढू लागली.

गणेशोत्सवाला सुरवात झाल्यानंतर पहिले दोन ते तीन दिवस संध्याकाळी पाऊस हजेरी लावत होता. त्यामुळे पुणेकर देखावे पाहण्यासाठी बाहेर पडू शकत नव्हते. रविवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली. पण, दुपारनंतर विश्रांती घेतली. त्यामुळे शहर आणि परिसरातून नागरिक देखावे पाहण्यासाठी पुण्यात आले. 

शहरातील मध्यवर्ती भागात धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक विषयांवर देखावे साकारले आहेत. काही मंडळांनी सजीव देखाव्यांवर भर दिला आहे. भव्य देखाव्यांची परंपरा असलेल्या मंडळांपुढे भक्तांची गर्दी उत्तरोत्तर वाढत होती. मंडळांनी हे देखावे पाहण्यासाठी चोख व्यवस्था केली होती. भाविकांचा उत्साह बघून मंडळांचे कार्यकर्ते येणाऱ्यांना मदत करीत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत होते. जिवंत देखावेही थांबून पाहणाऱ्यांची संख्या मोठी होती. देखावा झाल्यानंतर देशप्रेमाचे संदेश घेऊन हे भक्त पुढच्या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी मार्गस्थ होत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: 'आश्वासनं फसवी ठरली...'! डबेवाला संघटनेची उद्धव ठाकरेंवर नाराजी; महायुतीला पाठिंबा देत सत्ता बदलाचा इशारा

Vijay Hazare Trophy: १५ चौकार, ८ षटकार अन् दीडशतक... ध्रुव जुरेलची विस्फोटक खेळी, रिकू सिंगनेही साथ देत ठोकली फिफ्टी

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

Saptashrungi Temple : वणी साप्तश्रृंगी गडावर श्री भगवती मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले; भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था!

Latest Marathi News Live Update : उल्हास नगरमध्ये महायुती फुटली; भाजपचा शिवसेनेवर आरोप

SCROLL FOR NEXT