पुणे

गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार

नामदेव कुंभार

गणेशोत्सवामध्ये गर्दी होतेय असं जाणवल्यास पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी निर्बंधाचा निर्णय घेऊ.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास निश्चितपणे कठोर भूमिका घ्यावी लागेल. मात्र गणेशोत्सवामध्ये पुण्यात कोरोनाचे नवीन निर्बंध लादणार नसल्याची माहिती पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. कोरोनाचे नियम पाळा, गणेशोत्सवामध्ये कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असे आवाहन अजित पवार यांनी पुणेकरांना केलं आहे. यावेळी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

शहरातील गणपती मंडळाने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. त्यामुळे नागरिकांना ते पाहण्यासाठी येता येईल, मात्र खूप गर्दी होतेय असं जाणवल्यास पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी निर्बंधाचा निर्णय घेऊ. कृपया, तशी वेळ येऊ देऊ नका. सध्या पुण्यात नव्याने निर्बंध लादण्याचा कोणताही विचार नाही, असे अजित पवार यांनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना आधिक धोका असवल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यानुसार तयारी केली जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊनच शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

जवळपास दहा मिहिन्यापासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र, मोदी सरकारकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. हे जनतेचं दुर्दैव आहे. अशी टीका करतानाच इंधन दरवाढीवरुन अजित पवार यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. ते नियंत्रित करण्यासाठी केंद्राकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, असी टीका अजित पवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

IPL 2027 मध्ये राहुल द्रविड CSK चा मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंगची हकालपट्टी? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स...

Bakri Eid: बकऱ्याचा अजब 'डाएट प्लॅन'! रोज २५० ग्रॅम चिकन आणि कोल्ड्रिंक; AC त राहणाऱ्या काश्मिरी बकऱ्याची गोष्ट

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

FACT CHECK : वैभव सूर्यवंशीला Mumbai Indians कडून ३० कोटींची ऑफर; ललित मोदीने सत्य समोर आणलं, नेमकं काय सुरूय?

SCROLL FOR NEXT