पुणे

पुणे : तरुणाचे अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; टोळीस अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तरुणाचे अपहरण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्‍या आवळल्या. अपहरणाची घटना 9 डिसेंबरला पुरंदर तालुक्‍यातील चांबळी गावच्या हद्दीत घडली होती. 

आदित्य तानाजी चौधरी (वय 19, रा. नारायण पेठ, सासवड, पुरंदर), अनिकेत महादेव काळे (वय 19), सागर वसंत काळे (वय 19, दोघेही रा. करमाळा, सोनोरी, पुरंदर), संकेत महादेव कुंभार (रा.जय महाराष्ट्र चौक, सासवड), अभिजित विजय भिलारे (रा. भिलारेवाडी, हातवे बुद्रुक, भोर), संतोष बाळासाहेब पवार (वय 19, रा. मुकादमवाडी व्हाला, पुरंदर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महेश भैरवनाथ कामठे (वय 25, रा.चांबळी, पुरंदर) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामठे हे शेती करतात. 9 डिसेंबरला सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास चांबळी गावच्या हद्दीमध्ये दिगंबर शेंडकर याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने फिर्यादीचे अपरहण केले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला जबर मारहाण केली. शेंडकर याने त्यांच्या डोक्‍यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्या खिशातील रोख रक्कम घेऊन आरोपी तेथून पसार झाले.

फिर्यादी यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्‍वर धोंडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप जाधवर, श्रीकांत माळी, राजु चंदनशीव, सचिन गायकवाड, रविंद्र शिनगरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्‍लेषण व गोपनीय माहितीआधारे आरोपींना अटक केली.

चौधरी, अनिकेत काळे, सागर काळे, कुंभार यांच्याविरुद्ध सासवड व राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारखे गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT