Ganja
Ganja 
पुणे

विक्रीसाठी नेण्यात येणारा ३१ लाखांचा गांजा पकडला

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बदलापूर (जि. ठाणे) येथे विक्रीसाठी गाडीमधून गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना सीमाशुल्क विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ३१ लाख रुपये किमतीचा गांजा व २२ लाख रुपयांची गाडी असा एकूण ५३ लाखांचा ऐवज जप्त केला. नगर- कल्याण महामार्गावरील डोंबारवाडी टोल नाक्‍यावर ही कारवाई करण्यात आली.  

अंकुश भीमराव पाडुळे (रा. आष्टी, जि. बीड) व नितीन पिराजी आंबेकर (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थविरोधी पथकास दोघे जण बुधवारी इनोव्हा गाडीमधून हा गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पथकाने आळेफाट्याजवळ असलेल्या डोंबारवाडी टोल नाक्‍यावर सापळा रचला. त्या वेळी या ठिकाणी या गाडीची तपासणी केली असता तिच्यामध्ये १६५ किलो वजन असलेली एकूण सात गांजाची पोती आढळून आली. 

माहिती देणाऱ्यास बक्षीस 
शहर व जिल्ह्यामध्ये गांजा विक्री करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती सीमाशुल्क विभागास ०२०- २६०५१८०४ किंवा ०२०- २६०५१८४८ या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्यास सरकारकडून योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे वैशाली पतंगे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT