moharam.jpg 
पुणे

गणपती व मोहरमच्या मिरवणुकांबाबत मोठा निर्णय

सकाळवृत्तसेवा

जुन्नर : कोरोनामुळे गणेशोत्सव व मोहरम निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकांना यंदा परवानगी मिळणार नसल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी येथे सांगितले.

गणेशोत्सव व मोहरम निमित्ताने आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार अतुल बेनके, नगराध्यक्ष श्याम पांडे , तहसीलदार हनुमंत कोळेकर, पोलीस उपअधीक्षक दीपाली खन्ना यांच्यासह शांतता समिती सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी व हिंदू - मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

पाटील म्हणाले, गणपती आगमन व विसर्जन, दररोजची आरती यासाठी फक्त पाच कार्यकर्त्यांना परवानगी आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.  कोरोनामुळे  आर्थिक संकटातील खऱ्या गरजूंना गणेश मंडळांनी मदत करावी. 

आयुष प्रसाद म्हणाले, सद्य स्थितीत एक गाव एक गणपती याचा विचार गांभीर्याने होणे आवश्यक आहे. एकमेकांशी स्पर्धा न करता एकत्रितपणे तसेच एकोप्याने सण-उत्सव  साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अतुल बेनके म्हणाले,  नागरिकांच्या आरोग्यासाठी  यावेळी सण-उत्सव सार्वजनिक पणे साजरे करू नयेत. सुमारे ३६ वर्षानंतर  गणेशोत्सव व मोहरम हे एकत्र येत आहेत. हिंदू व मुस्लिम समाजाचे  प्रशासनास सर्व सहकार्य राहील. रोज होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यावे आदी सूचना या बैठकीत नगरसेवक फिरोज पठाण, भाऊ कुंभार, गणेश इंगवले, मधुकर काजळे, नंदकुमार तांबोळी, दीपक परदेशी यांनी केल्या. प्रास्ताविक दीपाली खन्ना यांनी केले, सूत्रसंचालन विलास कडलाक यांनी केले. पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी आभार मानले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांच वाटप

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT