पुणे

रांजणगावमधील महागणपती मंदिर बुधवारी राहणार बंद

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महागणपतीचे मंदिर बुधवारी (ता. ३१) बंद राहणार असल्याची माहिती श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थान ट्रष्टतर्फे कळविण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवारी संकष्ट चतुर्थी असून, त्यानिमित्त मंदिरात दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन मंदिर बंद ठेवण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी देवस्थान ट्रष्टला पत्राद्वारे दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संकष्ट चतुर्थीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार असून, कोरोना साथीचा संसर्ग टाळणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

रांजणगाव गणपती हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून, तेथे पंचतारांकीत एमआयडीसीमुळे कामगारांची व स्थानिक नागरिकांची मोठी संख्या आहे. संकष्टी चतुर्थीनिमित्त महागणपतीच्या दर्शनाला आणखी गर्दी होऊन, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनाला रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायक महागणपतीचे मंदिर नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

चतुर्थीनिमित्त नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT