bhusari1.jpg
bhusari1.jpg 
पुणे

पुणेकरांनो, हे काय करताय? शिवसृष्टीच्या नियोजित जागेतच...

सकाळवृत्तसेवा

कोथरूड (पुणे) : शिवसृष्टी व बीडीपीसाठी राखीव असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात आहे. भुसारी कॉलनी येथील सौदामिनी सोसायटी लगत असलेल्या डोंगर उताराच्या भागावर टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्‍यता नागरिक व्यक्त करत आहेत. 

पर्यावरण अभ्यासक राकेश धोत्रे म्हणाले की, "जैव विविधता उद्यान व शिवसृष्टीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेत टाकण्यात येणाऱ्या राडारोड्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून या जागेचा नकाशाही बदलला जाणार आहे. पाणी वाहण्याचे नैसर्गिक स्रोत येथील राडारोड्यामुळे बंद झाले आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. कोरोना बंदोबस्तात अडकल्याचा फायदा घेत काही लोक येथे राजरोसपणे शेकडो ट्रकने राडारोडा टाकत आहेत. त्यामुळे येथे जैवविविधता उद्यान असो की शिवसृष्टी कशी उभी राहील याबाबत शंका वाटते. 

सामाजिक कार्यकर्ते नागेश ढमाले म्हणाले की, महापालिकेने व महसूलविभागाच्या अधिका-यांनी या जागेची पाहणी करुन राडारोडा टाकणा-या वाहनांचा पंचनामा करावा. त्यांच्याकडील परवाने तपासून पहावेत. कोणाच्या परवानगीने हे काम चालू आहे हे जनतेला कळावे. यात बेकायदेशीर बाबी आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. 

पुणे महानगरपालिका जैवविविधता समितीचे सदस्य दीपक दुधाणे म्हणाले की, महानगरपालिका क्षेत्रातील जैवविविधता जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नियमांची पायमल्ली करणारांवर महापालिकेने कडक कारवाई करावी. अन्यथा महापालिकाच बीडीपी बाबत गंभीर नाही असा संदेश जनमानसात जाईल. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

बावधनचे तलाठी सागर शेलार म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाचे काम चालू असल्यामुळे या प्रकारासंदर्भात उद्या प्रत्यक्ष स्थळ पाहणी करतो. आमच्याकडे अद्याप कोणाचीही तक्रार आलेली नाही. पाहणी झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT