कचरा डेपो, मोशी - यंत्राद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण करून प्रक्रिया करताना कामगार. 
पुणे

‘स्वच्छते’पुढे समस्या डोंगराएवढी (व्हिडिओ)

पीतांबर लोहार

पिंपरी - स्वच्छ भारत अभियानाचे चौथे वर्ष महात्मा गांधी जयंतीपासून (मंगळवार, ता. २) सुरू होत आहे. या अभियानात सध्या शहर देशात ४३ व्या स्थानावर आहे. ते पहिल्या दहामध्ये येण्यासाठी महापालिकेला डोंगराएवढी आव्हाने पार करावी लागणार आहेत. या वर्षी स्पर्धेत चार हजार २०३ शहरे असून, पाच हजार गुणांच्या आधारे ‘स्वच्छ शहरा’ची निवड होणार आहे. 

केंद्र सरकारच्या शहरी कार्य मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाचे चौथे वर्ष मंगळवारपासून सुरू होत आहे. त्यात देशातील पहिल्या दहा शहरांत क्रमांक पटकावण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे. त्यासाठी सरकारने वेगवेगळ्या चार विभागांसाठी निश्‍चित केलेल्या पाच हजार गुणांपर्यंत मजल मारण्याकरिता नागरिकांचा सहभाग वाढवून स्वतःही कार्यवाही करावी लागणार आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरात अवघ्या ३० टक्के कचऱ्याचेच वर्गीकरण केले जात असून, २० टक्के शहर अद्याप हागणदारीमुक्त झालेले नाही. त्यासाठी वैयक्तिक किंवा सामुदायिक स्वच्छतागृहे उभारावी लागणार आहेत.

नागरिकांशी थेट संपर्क साधून, हस्तपत्रके, सोशल मीडिया, जाहिराती व पथनाट्यांद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शाळा- महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रभातफेरी काढून व ‘स्वच्छता दिवस’ असे उपक्रम राबवून स्वच्छ भारत अभियानात लोकसहभाग वाढविला जाईल. 
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ही आहेत आव्हाने 
 पेपरलेस स्वच्छ सर्वेक्षण 
 कचरानिर्मितीच्या ठिकाणी शंभर टक्के वर्गीकरण
 स्टार रेटिंग प्रोटोकॉलची अंमलबजावणी 
 १०० टक्के हागणदारीमुक्त
 स्वच्छतागृहांची दुरुस्ती व नियमित स्वच्छता 
 स्वच्छ भारत ॲप्स डाउनलोड करणे व संख्या वाढविणे 
 घरच्या घरी कचऱ्यापासून खतनिर्मितीवर भर देणे

कसोटीवर उतरण्यासाठी
स्वच्छतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी महापालिकेला ३० नोव्हेंबरपर्यंत सिटी प्रोफाइल अपलोड करावे लागेल. मासिक ऑनलाइन माहिती अद्ययावत करावी लागेल. १५ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करावी लागतील. चार ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत स्वच्छ सर्वेक्षण पूर्ण करावे लागेल.

असे मिळतील गुण 
 थेट निरीक्षण - स्वच्छता व कचरा विलगीकरण. यामध्ये घरे, बाजारपेठा, स्वच्छतागृहे, मंडई, रेल्वे व बस स्थानके, झोपडपट्ट्या आदी ठिकाणांचा समावेश. 
 नागरिकांचा प्रतिसाद - कचरा विलगीकरण, हागणदारीमुक्त शहर, ‘स्वच्छता ॲप’चा वापर
 सेवास्तर प्रगती किंवा स्वयंमूल्यांकन - कचरा संकलन व वाहतूक, विल्हेवाट, माहिती प्रसारण, नवीन उपक्रमांची माहिती विचारात घेतली जाईल. 
 प्रमाणपत्र किंवा स्टार रेटिंग - स्टार रेटिंग देताना प्लॅस्टिकबंदी, सांडपाणी व पाणीपुरवठा व्यवस्थापन, स्वयंशिस्त आदी बाबींची पाहणी स्वच्छ भारत अभियानाचे पथक करणार आहे. 
(प्रत्येक विभागाला १२५० गुण. त्यामुळे चारही विभागांत महापालिकेला प्रगती करावी लागेल.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Barack Obama : बराक ओबामा यांच्या आवडत्या गाण्यांची 'प्ले लिस्ट' समोर...संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 'या' प्रार्थनेचा समावेश

Rohit Sharma : रोहितसोबत 'डबल गेम'! BCCI ने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची केलीय सक्ती; मुंबई संघाने डावलले, संभाव्य यादीत नाव नाही

Epstein files : रशियन पासून अफ्रिकन पर्यंत अशा निवडल्या जायच्या मुली, कसा ठरवला जायचा रेट? जगाला हादरवणारे High Profile Sex Scandal

Latest Marathi News Live Update : माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीबद्दल लिलावती रुग्णालयाची चार वाजता पत्रकार परिषद

Indian Railway Ticket : रेल्वे तिकीटावरील GNWL, RLWL, PQWL म्हणजे काय? RAC तिकीट कन्फर्म असतं का? प्रवासापूर्वी नक्की जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT