workers11.jpg 
पुणे

`त्या` एका मेसेजने विझवली अनेकांच्या पोटाची आग

सुषमा पाटील.

रामवाडी (पुणे) : पुणे-नगर रोडमार्गे परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी निघाले आहे. त्या भुकेलेल्या माणसांसाठी स्वः इच्छेने प्रत्येक घरातून तीन पोळ्या, शेंगदाण्याची चटणी आणि पाण्याची बाटली देण्याचे आव्हान गार्डेनिया सोसायटी फेज एकच्या चेअरमनच्या वतीने सोसायटीच्या व्हॉट्‌सअप ग्रुप वर करण्यात आले होते. तो मेसेज वाचून प्रत्येक रहिवाशांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. अन्‌ बघता बघता पोळ्या, शेंगदाण्याची चटणी आणि पाण्याची बाटली हे सर्व पार्सल रविवारी सकाळी नऊ वाजता सोसायटीच्या आवारात जमा झाले. 

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यास शासनाकडून परवानगी मिळाली असल्याने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश भागात राहणारे हजारो परप्रांतीय नगर रोडमार्गे त्यांच्या गावी निघाले आहे. कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व कामे ठप्प झाली. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ना कामधंदा, ना डोक्‍यावर छप्पर, ना जवळ पैसा नाही. अशी अवस्था निर्माण झाल्याने अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परत जात आहेत. 

सरकारी एसटी किंवा खासगी वाहनाने दररोज शेकडो मजूर त्यांच्या गावी जात आहेत. त्यांना विविध संस्था संघटना मदत करत आहेत. याप्रमाणेच गार्डेनिया सोसायटीतील 175 फ्लॅटमधून सकाळी नऊ वाजता तीनपेक्षा जास्त पोळ्या चटणी आणि पाण्याची बाटली हे सर्व साहित्य सोसायटीच्या आवारातील बाकड्यावर ठेवून रहिवासी जात होते. यामध्ये ज्येष्ठ महिलांसह तरुणाईही उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

जमा झालेले अन्न घेऊन सोसायटीतील काही तरुण नगर रस्त्यावर थांबले. त्यांनी गावी जाणाऱ्या मजुरांना पाकिटे पाण्याची बाटली दिली. येथील रहिवासी शरद अडसूळ म्हणाले, सर्वजण मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत पण आपल्या जवळील थोडं अन्न देण्याचे आवाहन केले होते. तीन पेक्षा जास्त पोळ्या रहिवाशांनी आणून दिल्या. सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही अन्न वाटपातून छोटीशी मदत त्या मजुरांना करीत आहोत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT