Gas is sold by extracting gas from cylinder and selling it in small amounts 
पुणे

गॅस सिलेंडरमधील गॅस काढून त्याची छोट्या टाक्‍यांद्वारे अवैधरीत्या विक्री 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्यावसायिक व घरगुती गॅस हा सिलेंडरमधून काढून तो अवैधरीत्या छोट्या टाक्‍यांमध्ये भरून त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकास अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

प्रदीप गुंडु धुमाळे (वय 32, रा. कुमार सोसायटी, फुरसुंगी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तु अधिनीयमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार एस. के. जोशी यांनी फिर्याद दिली आहे.

कोण आहेत न्या. मुरलीधर? ज्यांची रातोरात बदली झाली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी येथील देशमुख मळा येथील नवीन कॅनॉलजवळ रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती हा व्यावसायिक व घरगुती कारणांसाठी वापरला जाणारा एचपी कंपनीच्या गॅस सिलेंडरमधील गॅस अवैधरीत्या काढून तो छोट्या टाक्‍यांमध्ये भरत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी छापा घातला. त्यावेळी पोलिसांना तेथे एचपी कंपनीचे 19 किलो वजनाच्या 26 मोकळ्या टाक्‍या, चार किलोच्या 26 मोकळ्या टाक्‍या, रिलॅक्‍स कंपनीचे 15 किलो वजनाच्या नऊ मोकळ्या टाक्‍या, एक फिलर व एक इलेक्‍ट्रॉनिक वजनकाटा असा 76 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. धुमाळे हा अवैधरीत्या गॅस सिलेंडरमधून काढून तो अन्य गॅस कंपनीला विकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT