doctor sakal
पुणे

डॉक्टरांना मारहाण प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

मुलाच्या आईने नशेत असताना रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषेत वर्तन करून केली मारहाण

चंद्रकांत घोडेकर ः सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : घोडेगाव ता आंबेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या मुलाच्या आईने नशेत असताना रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषेत वर्तन करून मारहाण केली. हा प्रकार काल रात्री साडेअकराच्या सुमारास घडला याप्रकरणी विधि ग्रस्त बालक व त्याची आई माया बाळासाहेब बोराडे यांच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला अटक करण्यात आली आहे.

पती-पत्नीच्या भांडणामुळे मुलाने विषारी औषध घेतले. त्या मुलावर उपचारासाठी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता नशेत असलेल्या माया बाळासाहेब बोराडे या मुलाच्या आईने रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषेत वर्तन करून मारहाण केली. तसेच रुग्णालयातील दरवाजाच्या काचा तोडल्या .

याठिकाणी नशेत असणाऱ्या माया बोराडे यांनी डॉ प्रीती डामसे व रुग्णालयातील कर्मचारी राम सुपे, जिजाबाई लाडके यांच्याशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केली . विधिसंघर्षग्रस्त बालक याने फेसबुक लाईव्ह करून मी ग्रामीण रूग्णालयातील टेरेसवर जाऊन आत्महत्या करणार आहे .अशी धमकी दिली. रुग्णालयातील काचेचे दरवाजे व खिडक्यांच्या काचा फोडल्या व रुग्णालयाचे नुकसान केले. यावरून सदर महिला व तिचा विधिग्रस्त मुलावर घोडेगाव पोलिस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ग्रामीण रुग्णालयातील डॉ प्रीती डामसे यांनी तक्रार दिली आहे. शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करून शांततेचा भंग केला व सुरक्षारक्षकाला शिवीगाळ दमदाटी देवून मारहाण केली. तसेच रुग्णालयाचे पार्टिशन दरवाजा, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच इतर शासकीय मालमत्तेचे तोडून फोडून नुकसान केले. पुढील तपास घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक जीवन माने करत आहे. सदर महिला आरोपीला घोडेगाव न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT