Ajit Pawar Sakal
पुणे

Ajit Pawar : घोडगंगा कारखाना फक्त आम्ही सुरु करू शकतो

'अविवाहित मुलाला कारखान्याचा अध्यक्ष करू नको असा मी तुमच्या आमदारांना वेळोवेळी सल्ला दिला होता. मात्र त्यांनी माझे ऐकले नाही.

सकाळ वृत्तसेवा

- प्रमोल कुसेकर

आंधळगाव - 'अविवाहित मुलाला कारखान्याचा अध्यक्ष करू नको असा मी तुमच्या आमदारांना वेळोवेळी सल्ला दिला होता. मात्र त्यांनी माझे ऐकले नाही. पर्यायाने कारखाना बंद पडण्याच्या मार्गांवर आहे. त्यांनी मात्र आपला खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. माझ्या सांगण्यावरून त्यांना तुम्ही मते दिलीत. मात्र आमदारांनी कारखान्यात लक्ष न दिल्याने घोडगंगा कारखाना बंद पडला. यातच माझी खरी चूक झाली.

तुमचा कारखाना संकटातून बाहेर येऊ शकतो. त्यासाठी फक्त तुम्ही मला साथ द्या. आम्ही सोडून घोडगंगा कारखाना कुणीही चालू करून दाखवावा. मंत्रिमंडळात सर्व खाती आमच्याकडे असल्याने तो फक्त आम्हीच चालू करू शकतो. असे खुले चॅलेंज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांना जाहीर सभेत केले. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

बोलताना पवार म्हणाले, विद्यमान संचालक मंडळाला घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून लवकरच तुमचा कारखाना संकटातून बाहेर येऊ शकतो. मांडवगण फराटा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. माधवराव फराटे यांनी मी राजकारणात नवका असताना मला वेळोवेळी मोलाची साथ दिली.

आपल्या भागात पिकवलेला ऊस आपल्याच कारखान्यात जावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. आता तुमचा ऊस लगतच्या भागातील कारखान्यात जातोय. त्यांचा काटा चांगला आहे. मात्र, ऊस देताना काटा नक्की चेक करा, बरेच कारखानदार काटा मारतात. आपण कष्टाने, घाम गाळून पिकवलेला ऊस आहे. त्यात आपली फसवणूक होणार नाही, यासाठी काटा तपासत चला, असा सल्ला अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला.

'लोकांना तुमचे प्रतिनिधी आणि मी कधीतरी एकत्र येऊ असे वाटत होते, पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आता फाटी पडली आहेत. ते एका टोकाला आपन एका टोकाला आहोत. मी अमोल कोल्हेंसाठी मत मागितली. नंतर कोल्हे दोन वर्षांनी राजीनामा देतो म्हटले. अमोल कोल्हे हे माझ्या व्यवसायावर परिणाम झाल्याने राजीनामा देतो म्हटले होते. खरंच राजकारण हा कोल्हेंचा पिंडच नाही. सेलिब्रीटींना तिकिट देतो यात आमच्या ही चुका आहेत.

आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढे आणतो. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले आणि मग राजीनामा दिला. पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. 'आम्हाला उमेदवार भेटला नाही की, आम्ही कलाकाराला उभं करतो, अमोल कोल्हे हेदेखील त्यापैकीच एक',असं सांगत अजित पवारांनी पुन्हा एकदा खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.

'नाट्य प्रयोगामधून अमोल कोल्हे हे वातावरण निर्मिती करत आहेत. मात्र, ही त्यांची तात्पुरती वातावरण निर्मिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील आता यापुढं मी काम करेन. बघा आत्ताही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करताहेत, ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे. पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं? याचाही विचार करा.

अमोल कोल्हे यांना छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे पाहून मतदारांनी निवडून दिले आहे. पण वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या कार्यक्रमात अमोल कोल्हे पाठोपाठ तुमचे आमदारही उठून निघून गेले. बाहेर जाऊन यांनी वेगळंच सुरू केलं', असं सांगत अजित पवारांनी खासदार कोल्हेवर जोरदार निशाणा साधला.

'उद्याच्या लोकसभा निवडणूकीत कोल्हे म्हणतील आता मी काम करतो. पण त्यांना निवडून देण्याची परत चुक करू नका. वेगवेगळ्या मतदार संघात ते नाटकांचे शो करत आहेत. पण आता देशाची हवा मोदींच्या बाजूने आहे. मोदी की गॅरंटी आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विचारांचा खासदार निवडून द्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत आता माझी चांगली ओळख झालेली आहे. मी त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवत आहे. लवकरच साडेआठ लाख सोलरवर चालणारे पंप शेतकऱ्यांना देणार आहोत. सोलर पॅनलची योजना महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेली आहे,' असेही अजित पवार म्हणाले.

यावेळी राज्य प्रवक्ते उमेश पाटील, प्रदीप गारटकर, पोपटराव गावडे, रमेश थोरात, सुदर्शन जगदाळे, सुरेश घुले, केशर पवार, राजेंद्र नागवडे, वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, मोनिका हरगुडे, रवी काळे, दिलीप वाल्हेकर, स्वप्निल ढमढेरे, निखिल तांबे, शशिकांत दसगुडे, कुसुम मांढरे, श्रीनिवास घाडगे, बाबासाहेब फराटे, अमोल वर्पे, राजेंद्र जगदाळे, राजेंद्र कोरेकर, दादासाहेब कोळपे, विजेंद्र गद्रे, दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, श्रुतिका झांबरे, समीक्षा कुरुमकर फराटे, अशोक जगताप आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT