ghorpadi Railway Flyover
ghorpadi Railway Flyover sakal
पुणे

Railway Flyover : घोरपडीकरांचा 40 वर्षाचा वनवास संपला

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी - बी टी कवडे रस्त्यावरील थोपटे चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचे उद्घाटन झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. घोरपडीकरांचा चाळीस वर्षाचा रेल्वे फाटकचा वनवास संपुष्टात आला आहे. यामुळे नागरिकांना विना फाटक प्रवास करता येणार आहे. आज पूल नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने घोरपडी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

घोरपडी मधून मुंढवा,खराडी,कोरेगाव पार्क, कल्याणी नगर या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांना हा रेल्वे उद्यान पूल अत्यंत सोयीचा झाला असल्याने नागरिकांचा वेळ आणि पेट्रोल वाचणार आहे. तसेच सोलापूर रेल्वे मार्गावरील वाहतूक कोंडी आणि रेल्वे फाटक लागल्यामुळे करावी लागणारी प्रतीक्षा ही समस्या कायमस्वरूपी बंद झाली आहे

अनेक वर्षांपासून सोलापूर व मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वेफाटकमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले होते. साधारण एका दिवसात दोनशे पेक्षा जास्त रेल्वे या मार्गावरून जात आहेत. त्यामुळे घोरपडीमध्ये सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहनचालक , शालेय विद्यार्थी व नागरिकांची गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

अनेकदा रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने दुर्घटना घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथील उड्डाणपुलासाठी परवानगी दिल्यावर हे काम मार्गी लागले. त्यानुसार सप्टेंबर २०१९ मध्ये याचे निवडणुकीच्या तोंडावर याचे भूमिपूजन करण्यात आले होते. जवळपास पाच वर्षांनी या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.

रेल्वे पुलांची माहिती -

१. रेल्वे उड्डाणपुलाची लांबी

अ . घोरपडी ते मुंढवा रस्त्यावर ३५३.०० र.मी. ब . बी.टी. कवडे रस्त्यावर १४०.०० र.मी.

२. रेल्वे उड्डाणपुलाची रुंदी

अ . घोरपडी ते मुंढवा रस्त्याकडे १०.५० र.मी.

ब . बी.टी. कवडे रस्त्याकडे ६.५० र.मी.

३. उड्डाणपुलाची पोहोच रस्त्यासह एकूण लांबी :१०१६.०० मी

घोरपडी करांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला रेल्वे उड्डाणपूल जवळपास 40 वर्षांनी झाला आहे. याच्या उद्घाटन प्रसंगी राज्यातील किंवा केंद्रातील मान्यवर नेता यावा अशी घोरपडीकरांची आशा होती. परंतु निवडणुकीच्या तोंडावर याचे उद्घाटन केल्यामुळे पुण्यात राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असूनही या कार्यक्रमाला न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी आहे.

तसेच ऑनलाईन बोलता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या बारा सेकंदात या पुलाच्या उद्घाटनाविषयी बोलल्याने नागरिकांमध्ये आणखीनच नाराजी पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT