Indapur
Indapur 
पुणे

इंदापूर : विद्युत उपकेंद्राचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन

डॉ. संदेश शहा

इंदापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शिरसोडी (ता. इंदापूर) येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राची क्षमतावाढ प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, पुष्पा रेडके, माऊली चवरे, नानासाहेब शेंडे, राजेंद्र चोरमले, अॅड. रामकृष्ण मोरे,मारूतराव वणवे, तानाजी थोरात, विशाल बोंद्रे, नंदू पानसरे, लक्ष्मण देवकाते, तहसिलदार सोनाली मेटकरी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले, शेतकरी हे प्रगतीशिल बागायतदार व्हावेत हे सरकारचे स्वप्नअसून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारने राज्यभर वीजेचे जाळे अखंडित व सुलभ होण्यासाठी यंत्रणा राबविली आहे. अपारंपारिक व सोलर ऊर्जेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. पंडीत दिनदयाळ योजनेतून शिरसोडी येथे ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र उभा केल्याने पिंपरी खुर्द, सुगाव, आजोती, शिरसोडी, पडस्थळ, पेटकरवस्ती, चिंदादेवी या गावांना फायदा होणार असून त्याचा थेट लाभ ५ हजार शेतक-यांना होणार आहे. प्रकल्पाचा खर्च ८० लाख ३० हजार रूपये आला असून शिरसोडी उपकेंद्राची क्षमता १० एमव्हीए वरून १५ एमव्हीए करण्यात आली असून त्याचा फायदा शेतक-यांना होणार आहे.

आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील तालुक्याच्या विकासासाठी पालक -मंत्री गिरीष बापट यांचे नेहमी सहकार्य होते. पंडीत दिनदयाळ ग्राम ज्योती योजनेअंतर्गत तालुक्यात ९०० तर सौभाग्य योजनेअंतर्गत २०६६ ग्राहकांना वीजजोड देण्यात आले असून इंदापूर शहरात ६ रोहित्राची क्षमता वाढ झाली आहे. शहरातील वीजतारांचे जाळे कमी करण्यासाठी भुमिगत वाहिन्यांचे ४५ कि. मी भुमिगत वाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. ३ कोटी ८२ लाख रूपयांची कामे प्रगतीपथावर आहे. शेतीपंपास स्वतंत्र्य रोहित्र देण्यासाठी १८.३२ कोटी रूपयांच्या निविदांची लवकरच कामे सुरू होणार आहेत. झगडेवाडी, कळस तसेच शेळगाव उपकेंद्राची क्षमता वाढ कामे प्रस्तावित केली असून तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे.

प्रास्ताविक बारामती परिमंडळ मुख्य अभियंता सुनिल पावडे तर सुत्रसंचलन उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे यांनी केले. आभार प्रदर्शन अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री. लटपटे, श्री. कोरडे, रघुनाथ गोफणे, अरूण चव्हाण, स्वप्निल जोरी या अधिका-यांनी प्रयत्न केले.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सासू तर काँग्रेस सुन आहे. मात्र आम्ही मुलगी आहे. मुलीस सासू तसेच सुनेस संभाळून घ्यावे लागते. त्यामुळे आमची वागण्याची नेहमीच पंचायत होते असे सुचक वक्तव्य पालक मंत्री बापट यांनी करताच त्याचे टाळ्यांच्या गजरात उस्फुर्त स्वागत झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT