rutuja amale 
पुणे

लय भारी...आदिवासी भागातील मुलगी पोचली शंभर टक्क्यांच्या उंबरठ्यावर...

मीननाथ पानसरे

आपटाळे (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील ऋतुजा प्रकाश आमले या विद्यार्थिनीने दहावीच्या परिक्षेत 99.60 टक्के गुण मिळवत जुन्नर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात मोठे यश मिळविले आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. 

जुन्नरच्या आदिवासी भागातील बोतार्डे- आमलेवाडी येथील ऋतुजा आमले ही विद्यार्थिनी जुन्नर येथील श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे विद्या मंदिरात शिक्षण घेत होती. तिचे वडील प्रकाश आमले व आई नंदा हे दोन्ही शेतकरी असून, जेमतेम शेती असल्याने घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, शिक्षण घेण्याची जिद्द व चिकाटी याच्या जोरावर ऋतुजा हिने मोफत एसटी बसच्या सुविधेमुळे दररोज नियमित प्रवास करून जुन्नर येथील अण्णासाहेब आवटे विद्या मंदिरात शिक्षण पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत तिने 500 पैकी 491 गुण मिळवत 99.60 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तर, संस्कृत विषयात तीने 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.

आदिवासी भागातील विद्यार्थिनीने तालुक्यात मिळविलेले हे यश मोठे आहे. अभ्यासात हुशार असलेल्या ऋतुजा हिचा शालेय स्पर्धांमध्ये देखिल सहभाग उल्लेखनीय होता. वक्तृत्व स्पर्धांमध्ये तीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या यशाबद्दल श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास चव्हाण, उपाध्यक्ष अविनाश पुंडे, जयश्री हेंद्रे, पर्यवेक्षक सुरेश थोरवे, वर्गशिक्षक प्रवीण ताजने यांसह शिक्षक, पालक व माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती?

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

Alandi Spiritual Visit: आळंदीत चैतन्यमय वातावरण; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत बिट्टा यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT