Poultry 
पुणे

पोल्ट्रीतील कोंबड्यांसाठी पौष्टिक म्हणून द्या हे खाद्य!

ब्रिजमोहन पाटील

पुणे - पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यासोबत त्यांचे वजन वाढावे व रोग होऊ नयेत यासाठी प्रतिजैवके (अँटिबायोटिक औषधे) दिली जातात. याचे दुष्परिणाम कोंबडीचे मांस खाणाऱ्यांवर होतो. त्यासाठी पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना पौष्टिक असे मशरूमचे खाद्य दिल्यास प्रतिजैवकांचा वापर कमी केला जाऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे. या मशरूमच्या संशोधनाला पेटंट देखील मिळाले आहे. 

आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागातील सहायक प्रा. डॉ. हिरालाल सोनवणे यांनी ‘स्टडी द व्हेरियस मशरूम बेस फूड सप्लिमेंट ॲज पोल्ट्री अँड ॲनिमल फिड्स’ या विषयात संशोधन केले आहे. डॉ. विक्रम घोले, डॉ. जितेंद्र वैद्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी मार्गदर्शन केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोल्ट्री फार्ममध्ये हजारो कोंबड्यांना खाण्यासाठी मका, सोयबीन, नाचणी यासह इतर धान्यांचा चुरा टाकला जातो. कोंबड्यांचे वजन वाढण्यासाठी त्यांना हे खाद्य पुरेसे नसल्याने अनेक पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना अँटिबायोटिक इंजेक्शन दिले जातात. त्यामुळे त्यांचे वजन वाढते तसेच रोगराईपासून त्यांना संरक्षण मिळते. कोंबड्यांना रोगाची लागण झाल्यास हजारो कोंबड्या मारून टाकाव्या लागतात, त्यामुळे या उद्योगाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. अँटिबायोटिक औषधांचा होणारा परिणाम आणि त्याचा वापर टाळण्यासाठी जैविक पद्धतीने मशरूम तयार करण्यासाठी अभ्यास करण्यात आला आहे. 

धायरीतील पोल्ट्री फॉर्ममध्ये प्रयोग
धायरीतील एका पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांना हे मशरूम देण्यात आले असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. अँटिबायोटिक औषधांचे डोस सतत दिल्याने ते त्याचा काही अंश कोंबड्यांच्या पोटात असतात. त्या खाण्यासाठी गरम पाण्यात उकडल्या तरी हा औषधांचा अंश पूर्णपणे निघून जात नाही. त्यामुळे चिकन खाताना त्या औषधाचा आपल्या शरिरात प्रवेश होतो, त्यातून त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हे मशरूम आपल्यासाठीही लाभदायक आहे, असे असे प्रा. हिरालाल सोनवणे म्हणाले.

महत्त्वाचे असे काही

  • या संशोधनात पश्चिम घाटातून विविध मशरूम संकलित करण्यात आले
  • ते टिश्‍यू कल्चर पद्धतीने प्रक्रिया करून ते प्रयोगशाळेत वाढविण्यात आले
  • या मशरूममुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना आवश्‍यक असलेले पौष्टिक खाद्य मिळू शकते
  • त्यातून कोंबड्यांचे वजन वाढते, प्रतिजैवकेही देण्याची गरज पडणार नाही

कोंबड्यांसाठी उपयुक्त असलेल्या मशरूमचे गेल्याच आठवड्यात पेटंट मिळाले आहे. पोल्ट्री चालकांना सोयाबीन, मका या खाद्यपदार्थांसाठी जेवढा खर्च येतो, तेवढाच खर्च या मशरूमसाठी येणार आहे. २०१५ पासून याचे नियमीत ट्रायल घेण्यात आले असून, हे मशरूम बाजारात आणण्यासाठी ‘स्टार्टअप’ सुरू केले जाणार आहे. त्यासाठीही प्रक्रिया सुरू आहे.
- प्रा. हिरालाल सोनवणे

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT