Paper 
पुणे

पेपरवाल्या काकांना द्या मदतीचा हात!

सकाळवृत्तसेवा

कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर, व्यावसायिकांवर व नोकरदारवर्गावर आर्थिक परिणाम झाला. त्यात काही व्यवसायांवर हजारो लोकांचे कुटुंब अवलंबून असल्याने अशा कुटुंबांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इलेक्‍ट्रॉनिक व सोशल माध्यमातून कोरोना संसर्गाबद्दल चुकीचा संदेश समाजात गेल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून वृत्तपत्र विक्री व्यवसाय चालू अन्‌ बंद, या चक्रात अडकला आहे. आज सोशल आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या भडक आणि बेजबाबदार बातम्यांच्या काळात वृत्तपत्राची विश्वासार्हता अबाधित आहे. ‘टीआरपी’च्या चढाओढीमध्ये प्रत्येक बातमीमध्ये ‘ब्रेकिंग न्यूज’ शोधण्यापेक्षा, मिळालेल्या प्रत्येक बातमीची पूर्ण शहानिशा करूनच बातमी प्रसिद्ध करण्याची परंपरा आजही वृत्तपत्र माध्यमांनी जपली आहे आणि हेच खात्रीलायक व विश्वासपूर्ण बातमीचे स्रोत आपल्यापर्यंत पोचविणारा घटक म्हणजे आपला वृत्तपत्र विक्रेता.

अखंड सेवा पुरविणारा घटक
ऊन, पाऊस व वाऱ्याची पर्वा न करता अखंड सेवा पुरविणारा हा घटक आज व्यवसायाची लढाई लढत आहे. मुसळधार पावसातही वर्तमानपत्र अगदी कोठेही ओले न करता आपल्या सर्वांपर्यंत पोचविताना स्वतः ओलेचिंब होणारे, स्वतःच्या घरातील आनंदाचा क्षण असो अथवा दुःखद घटना, याचे कोणतेही कारण न देता ठरलेल्या वेळेत आपल्यापर्यंत पेपर पोचविणारे, शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असली, तरी आपला पेपर आपल्याला वेळेत देणारे हेच ते ‘पेपरवाले काका’ आज अनेक अडचणींना सामोरे जात आहेत.

कोरोनाच्या संकटात उपेक्षा
ग्राहकांमध्ये होणारे समज-गैरसमजाचे वातावरण, अंक वितरणासाठी मनुष्यबळाच्या उपलब्धतेची समस्या, प्रत्यक्ष ग्राहकाकडे मासिक बिल मिळविण्यासाठी फिरण्यास आलेल्या मर्यादा, त्यामुळे रोजचे भांडवल पाहावे की कुटुंबाचा उदरनिर्वाह, या कात्रीमध्ये वृत्तपत्र विक्रेते सापडले आहेत. या अतिशय अडचणीच्या काळातही वृत्तपत्र विक्रेते आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत. आपल्या प्रत्येकाची वाचनाची भूक भागवत आहे. ही खरेतर कौतुकाची बाब आहे. परंतु, आता हा आपला विश्वासार्ह बातम्या पुरविणारा घटक कोरोनाच्या संकटात उपेक्षित आहे.

दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या व आस्थापना, सार्वजनिक मंडळे व वाचकांकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत. या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी मदतीचा हात पुढे करून वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिक सक्षम करण्यासाठी मदत करावी.

येथे पाठवा मदत...
Bank - बॅंक ऑफ महाराष्ट्र, बाजीराव रोड, पुणे
A/C Name - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ, पुणे
A/C No. - ६०१३१०८८७३०
IFSC Code - MAHB००००००१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT