CM_Uddhav_thackeray 
पुणे

'वर्षा बंगल्यावर धुणी-भांडी करायचं काम द्या';NET-SET धारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारकडून राज्यात सहाय्यक प्राध्यापक भरतीला परवानगी दिली जात नसल्याने याविरोधात नेट सेट पात्रताधारकांनी अनोखे आंदोलन केले. नेट-सेट धारकांची वर्षा बंगल्यावर धुणी, भांडी कर्मचारी किंवा स्वयंपाकी म्हणून नियुक्त करा, अशा मागणीचे शेकडो ई-मेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून त्वरित भरतीचा निर्णय घ्या, अशी मागणी केली.

नेट, सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीतर्फे रविवारी ही मोहीम राबविण्यात आली. राज्यातील नेट, सेट पात्र झालेले तरुण महाविद्यालयांमध्ये तुटपुंजा पगारावर काम करत आहेत. लॉकडाऊनमुळे तर अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. राज्य सरकारकडून प्राध्यापक भरतीचा निर्णय घेतला जावा त्यासाठी संघर्ष समितीतर्फे वारंवार शासनाला निवेदन दिले आहे.

‘उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या उपक्रमात मंत्री उदय सामंत यांना प्रत्येक विद्यापीठात निवेदन दिले आहे. मात्र, प्राध्यापक भरतीचा निर्णय घेण्याची मानसिकता नाही. यामुळे आज संघर्ष समितीतर्फे ई-मेल मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जर सरकारला प्राध्यापक भरती करता येत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला त्यांच्या घरी धुणी भांडी करणे,  वॉचमन म्हणून नेमणूक करणे, स्वयंपाकी म्हणून काम द्या, बागकाम करण्यासाठी नोकरी द्यावी अशा मागण्यांचे इमेल पाठविण्यात आले आहेत.

संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. सुरेश देवढे पाटील म्हणाले, ‘‘प्राध्यापक भरती होत नसल्याने बेरोजगार तरुणांची काय स्थिती आहे, हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देण्यासाठी ई-मेलची मोहीम राबविण्यात आली. राज्यभरातून नेट, सेट पात्रताधारक, पीएच.डी धारकांनी मोठ्या प्रमाणात ई-मेल केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरातील कामे करण्यासाठी नियुक्ती करा, अशी मागणी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Padma Awards 2026: राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान; भगतसिंह कोश्यारी, दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा समावेश

Chanakya Life Guide : 'या' 2 सवयींमध्ये बदल केल्यास तुम्हाला कोणच फसवू शकणार नाही

Bullet Train: बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गाला वेग! २१ किमी बोगद्यासाठी दुसरी 'टीबीएम' घणसोलीत दाखल

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT