Pune Municipal Corporation 
पुणे

पुणे महानगरपालिकेला थेट लस खरेदीसाठी राज्याच्या परवानगीची गरज नाही

अश्निनी केदारी जाधव

पुणे : मुंबई महापालिकेप्रमाणे पुणे महानगरपालिकेलाही ग्लोबल टेंडरची परवानगी देण्यात आली आहे. पुणे शहरातील लसीकरण गतीने करण्यासाठी पुणे महापालिकेने ‘ग्लोबल’ टेंडर करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक होत आहे. यावेळी पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अजित पवारांना लसीच्या खरेदीला परवानगी देण्याबाबत निवेदन दिले. ''वास्तविक अशा प्रकारे राज्यसरकारच्या परवानगीची आवश्यकता नसून पुणे महानगरपालिका लस थेट खरेदी करु शकते,'' असे अजित पवार यांनी सांगितले असून आता लवकरच निविदा काढण्यात येतील अशी प्रतिक्रिया गणेश बिडकर यांनी दिली

राज्य सरकार व केंद्र सरकारकडून येणारी लस ही पुण्याला अपुरी ठरत असून शहरातील लसीकरण केंद्रांवर गोंधळ होत आहे. नागरिकांना ऑनलाइन बुकिंग मिळेना आणि थेट केंद्रावर गेल्यास वशिल्याशिवाय काय होत नाही, अशी स्थिती आहे. पुढील काळात पुण्यासाठी किती लस राज्य व केंद्रातून मिळणार हे देखील स्पष्ट नाही. त्यामुळे पुणे महापालिकेने थेट ‘ग्लोबल’ टेंडर काढून लस खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि १८ ते ५९ या वयोगटातील लसीकरणासाठी पात्र असणाऱ्यांची संख्या सुमारे ३१ लाख ५० हजार इतकी आहे. प्रत्येक नागरिकास दोन डोस याप्रमाणे महापालिकेला किमान ६३ लाख डोसची आवश्‍यकता आहे. आत्तापर्यंत ९ लाख डोस देण्यात आलेले आहेत. तिसऱ्या लाटेपूर्वी पुण्यात जास्तीत जास्त लसीकरण करणे आवश्‍यक असल्याने त्यादृष्टीने पालिकेने तयारी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Barshi Crime : "संबंध ठेवले नाही तर गुन्हा दाखल करीन"; विवाहित शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल!

अरे ही मूर्ख आहे, हिला अक्कल आहे का... आठवणी सांगताना माधवी निमकरला अश्रू अनावर, म्हणाली, 'मी कधीच त्यांना उत्तर दिलं नाही पण..

SCROLL FOR NEXT