Gokhale Chowk in Pune is being beautified and an artist group is being set up there 
पुणे

ऐतिहासिक आणि साहित्यिक पार्श्वभूमी असलेल्या गोखले चौकाचे सुशोभीकरण ; तिथे साकारला जातोय कलाकार कट्टा

समाधान काटे

पुणे : शहराचे आणि कलाकारांचे नाते जुने आहे. पु.ल. देशपांडे, डॉ. श्रीराम लागू , डॉ. जब्बार पटेल, अभिनेते देवानंद अशा अनेक कलाकारांच्या आठवणी या गोखले चौकातील गुडलक कॅफे आणि पूर्वीच्या लकी हॉटेल परिसराशी जोडल्या गेल्या आहेत. अनेक कलाकारांचे याठिकाणाशी एक घनिष्ठ नाते आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यासगळ्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळावा, यासाठीच या कलाकार कट्ट्याच्या निर्मितीची संकल्पना पुढे आली. गोखले चौकाचे सुशोभिकरण करतानाच या भागात कायम येणाऱ्या नागरिकांच्या कानांवर आदळणाऱ्या वाहनांच्या गोंगाटाऐवजी त्यांना श्रवणीय अनुभूती देण्याची कल्पना आहे. शहरातील सर्व कलावंतांना एकत्र करून त्यांना सोबत घेऊन हा कलाकार कट्टा साकारला जात आहे. या कट्ट्यावर सर्व कलाकारांचे स्वागत आहे.

कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवक-युवतींपासून ते निवृत्त झालेल्या वयोगटातील प्रत्येकाचे स्वतंत्र कट्टे आहेत. त्याचप्रमाणे नवीन वर्षात ऐतिहासिक आणि साहित्यिक पार्श्वभूमी असलेल्या अत्यंत वर्दळीच्या अशा गोखले चौकाच्या (गुडलक चौक) एका कोपऱ्यामध्ये कलाकार कट्टा साकारला जाणार आहे. विविध क्षेत्रातील हौशी आणि नवोदित कलाकारांना, चित्रकारांना, वादकांना त्यांची कला सादर करण्यासाठी हे कायमस्वरूपी मुक्त व्यासपीठ या जागी निर्माण केले जात असून, पुणेकर रसिकांना विविध कलांचा आस्वाद या कट्ट्यावरील आगळ्यावेगळ्या बैठक व्यवस्थेतूनही घेता येणार आहे. गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याच्या  सुशोभीकरणासोबतच विविध कलाकारांसाठी कट्टा स्वरूपातील व्यासपीठ निर्माण करण्याचा हा प्रयोग प्रथमच केला जात आहे.

कलाकार कट्ट्याचे प्राथमिक काम महानगरपालिकेने पूर्ण केलेले असून, शहरातील विविध कलाकारांकडून येथील सजावटीसाठी कल्पना मागविण्यात आल्या आहेत. स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे आणि विविध कलाकारांकडून येणाऱ्या कल्पनांची सांगड घालून हा कट्टा आणखी आकर्षक करण्याचा संकल्प महानगरपालिकेने केला आहे. येत्या २६ जानेवारीपर्यंत त्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुणे महापालिकेने 'अर्बन स्ट्रीट डिझाईन’ गाईडलाईन्स नुसार शहरातील महत्वाच्या रस्त्यांचा कायापालट सुरू केला आहे. जंगली महाराज रस्त्यानंतर गोखले रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम करतानाच गोखले चौकाचे महत्त्व आणि या परिसराची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे काहीतरी वेगळी संकल्पना राबविण्याचा विचार सुरू होता. 

त्यातूनच परदेशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये राबविल्या जाणाऱ्या संकल्पनेवर आधारित कलाकार कट्टा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांनी त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला आणि काम सुरु झाले. सर्वच कलावंतांनी त्यांच्या उपलब्धतेनुसार केव्हाही येऊन त्यांच्या कलेचे येथे सादरीकरण करावे आणि आजुबाजूच्या रसिकांकडून त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ही कल्पना राबविण्याचा मानस पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजरे केला यांनी व्यक्त केला .
 
प्रतिकृती लवकरच

चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत राष्ट्रीय चित्रपट अकादमी आणि दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) शिकत असताना गुडलक आणि पूर्वीच्या लकी हॉटेलमध्ये कायम यायचे. एफटीआयआय पूर्वी प्रभात सारख्या चित्रनिर्मिती संस्थेचा सगळा डोलारा पुण्यात उभा होता. या संदर्भातून काही सजावट या चौकामध्ये केली जाणार असून कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करणाऱ्याची प्रतिकृती चौकात लवकरच बसविली जाणार आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT