Gold 
पुणे

बापरे! औषधी गोळ्यामध्ये (कॅप्सूल) लपविली सोन्याची भुकटी

सकाळवृत्तसेवा

पुणे - दुबईहून विमानाने पुण्यात आलेल्या महिलेकडून ६४२ ग्रॅमचे व तब्बल वीस लाख रुपयांचे सोने केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे चार वाजता जप्त केले. संबंधित महिला भुकटीच्या स्वरूपात सोन्याची तस्करी करीत होती, अशी माहिती पुढे आली. 

मरिअम मोहम्मद सलीम शेख (रा. मुंबई) हिच्याविरुद्ध भारतीय सीमा शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. स्पाइसजेट कंपनीचे दुबईहून आलेले विमान लोहगाव विमानतळावर रविवारी पहाटे चार वाजता उतरले. या विमानातील एका महिला प्रवाशाकडे तस्करीचे सोने असल्याची खबर सीमा शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली. विमानातून उतरून एक महिला गडबडीत विमानतळाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याचे अधिकाऱ्यांना दिसले. त्यांनी महिलेस थांबवून विचारणा केली. तेव्हा मरिअम शेख असे नाव तिने सांगितले. 

साहित्याची तपासणी केली. तेव्हा काही औषधी गोळ्या (कॅप्सूल) आढळल्या. या गोळ्यांची तपासणी केली असता त्यात सोन्याची भुकटी लपविल्याचे उघड झाले. 

ही कारवाई सीमा शुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. संबंधित महिला तस्करीचे सोने कोणाला देणार होती, यादृष्टीने तिच्याकडे तपास केला जात आहे, असे पतंगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये जसकीरतच्या बहिणीची चर्चा! तिच्या सौंदर्य पाहून अलिनाही वाटेल फिकी

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (PWC) अधिकाऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण

SCROLL FOR NEXT