Vehicle Purchasing Sakal
पुणे

सणामुळे वाहनांच्या खरेदीला ‘अच्छे दिन’

कोरोनामुळे गेल्या वर्षीही नागरिकांना वाहन खरेदीचा मुहूर्त साधता आला नाही. यंदा मात्र वाहन खरेदीसाठी नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनामुळे गेल्या वर्षीही नागरिकांना वाहन खरेदीचा मुहूर्त साधता आला नाही. यंदा मात्र वाहन खरेदीसाठी नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे.

पुणे - साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) दिवशी वस्तू खरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधून अनेक जण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. यामुळे येत्या २ एप्रिल रोजी असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहने (New Vehicle) घरी घेऊन येण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग सुरु असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षीही नागरिकांना वाहन खरेदीचा मुहूर्त साधता आला नाही. यंदा मात्र वाहन खरेदीसाठी नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल असल्याचे शहरातील विक्रेत्यांनी सांगितले. गुढीपाडवा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वाहनांच्या आगाऊ बुकिंगसाठी नागरिक विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये गर्दी करू लागले आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) वाहन नोंदणी ऑनलाइन केली आहे. त्यामुळे नोंदणीसाठी आता वाट पाहावी लागत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेल दरवाढ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.

‘आरटीओ’कडील वाहनानांची नोंद (१ ते २८ मार्च)

चारचाकी

पेट्रोल २२४८

डिझेल ८८०

सीएनजी १२९७

इलेक्ट्रिक २११

दुचाकी

पेट्रोल ८०१६

इलेक्ट्रिक ११९६

पेट्रोलचे दर सध्या वाढत असले, तरही नागरिकांचा पेट्रोलवरील वाहने खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. दीर्घ काळाचा विचार करून पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची खरेदी ग्राहकांकडून होत आहे. यंदा चांगला व्यवसाय होण्याची आपेक्षा आहे.

- रेश्मा कदम, व्यवस्थापिका, दुचाकी शोरूम

इलेक्ट्रिक वाहनानांबद्दल होणारी चौकशी आता खरेदीमध्ये रूपांतरित होऊ लागली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागरिक पर्याय शोधू लागले आहेत. गेल्या पाच दिवसांत आम्ही १०६ इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री केली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधण्यासाठी शंभरहून अधिक गाड्यांचे आगाऊ बुकिंग झाले आहे.

- भूषण शहा, इलेक्ट्रिक वाहन विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT