पुणे

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांना मिळतेय प्रतिबंधात्मक लसीबरोबर टाॅपची सोय

डी. के. वळसे-पाटील

मंचर : उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांना व लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिक अशा एकूण ५०० जणांना दररोज कांदा पोहे, खिचडी, उपमा, गापुरी–भाजी, चहा अशा स्वरूपाचा नाश्ता गोवर्धन दूध प्रकल्पाच्या वतीने दिला जात आहे, या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. 

मंचर उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ५ हजार ४७२ रुग्णांना लस देण्यात आली आहे. सोमवार (ता. १५) पासून दररोज ५०० नागरिकांना लस देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्कीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने यांनी दिली.

मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. १३) माजी खासदार (स्व.) किसनराव बाणखेले यांच्या पत्नी मथुराबाई बाणखेले यांच्या हस्ते लसीकरणासाठी आलेल्या नागरीकाना खिचडी व कांदा पोहे वाटप करण्यात आले. यावेळी मंचर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुहास बाणखेले, शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, संतोष गावडे रुग्णकल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे, निळकंठ काळे, राजेंद्र थोरात, संजय बाणखेले, रामदास किसनराव बाणखेले उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णाची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशसानाने डिंभे, तळेघर, अडिवरे, महाळुंगे पडवळ, निरगुडसर, पेठ, धामणी प्राथमिक आरोग्य केंद्र, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय, मंचर उपजिल्हा रुग्णालय तसेच गेटवेल हॉस्पिटल मंचर व भीमाशंकर हॉस्पिटल वडगाव काशिंबेग अशा एकूण ११ ठिकाणी प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत एकूण ९ हजार ९९१ नागरिकांनी लस घेतली आहे. गावोगावी लस घेण्याविषयी जनजागृती सुरु आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आंबेगाव तालुक्यातून दूरवरच्या भागातून ज्येष्ठ नागरिक सकाळी लवकर घरा बाहेर पडत्तात उपजिल्हा रुग्णालयात प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली अर्धा तास थांबावे लागते. नागरिकांच्या सोयीसाठी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार गोवर्धन दुध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. सोमवार (ता. १५) पासून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात ही लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.-सुहास बाणखेले अध्यक्ष, मंचर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT