पुणे

नारायणगाव परिसरात कडकडीत भारत बंद

रवींद्र पाटे

नारायणगाव : नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नारायणगाव परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता येथिल व्यापाऱ्यांनी आज बाजारपेठ बंद ठेऊन बंदला पाठिंबा व्यक्त केला. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगाव, ओतूर, आळेफाटा आज उपबजार बंद ठेवण्यात आले होते.

या मुळे आज टोमॅटो व भाजीपाल्याचे लिलाव झाले नाहीत. या मुळे नेहमी गजबजलेल्या येथील टोमॅटो व भाजीपाला उपबजारात व नारायणगाव बाजारपेठेत आज शुकशुकाट होता.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तीन कृषी कायदे केले आहेत.हे कायदे शेतकरी हिताचे नसून कंपनी हिताचे आहेत. कृषी कायद्यातील तरतुदी  शेतकरी हिताचे रक्षण करणाऱ्या नाहीत.भविष्यात भांडवलदाराकडून शेतमालाच्या साठवणुकीचा धोका असून याचा तोटा शेतकरी व ग्राहक या दोन्ही घटकांना होणार आहे.-श्रीराम गाढवे, अध्यक्ष अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्नर तालुका शेती प्रधान आहे.जुन्नर तालुक्यातील सर्व व्यापारी व शेतकरी बांधवांनी बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिला.  बंद शांततेत पाळण्यात आला.-अतुल बेनके, आमदार जुन्नर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT