पुणे

इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये भारत बंदला मोठा प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारने नव्याने आणलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी भारत बंद पुकारण्यात आला होता. पश्‍चिम भागातील लासुर्णे, जंक्शन, अंथुर्णे परीसरातील रस्त्यालगतची व मुख्य चौकातील दुकाने बंद ठेवण्यात  होती. तर आतील बाजूची दुकाने सुरु हाेती. वालचंदनगरमध्ये बंद संमिश्र प्रतिसाद मिळाला.

अनेक दुकानदारांनी निम्मे शटर बंद करुन दुकाने सुरु ठेवली होती. निमसाखरमध्ये सकाळच्या बहुतांश दुकाने सुरु होती. सणसरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भवानीनगरमध्ये व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. अत्याआवश्‍यक सेवा वगळता बहुतांश दुकाने बंद होती. येथे राष्ट्रवादी काॅग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठमधून मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध करुन घोषणा दिल्या.

यावेळी सणसर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष विक्रमसिंह निंबाळकर, इंदापूर खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, व्यापार पेठेतील प्रमुख अशोकराव काळे , निलेश सोनवणे, दत्तात्रेय शितोळे, नेताजी गायकवाड यांनी सहभाग घेतले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी निषेध सभा घेवून केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ,  सपकळवाडीमधील स्वर्गीय गणपतराव सपकळ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने अध्यक्ष गोपाळ शंकर सपकळ, जंक्शनमधील संजय भाेसले  यांनीही बंद ला पाठिंबा देवून नव्याने केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT