Voting esakal
पुणे

Pune: मतदानाला शंभर टक्के जा,भावनांना नाही तर मुद्द्यांना प्राधान्य द्या, सारासार विचार करूनच निर्णय घ्या;आता नाही तर मग कधी !

कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जो काही धुरळा उडाला त्यातून दोन चांगल्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे पुण्यातील खरे प्रश्न कोणते आहेत याची जाणीव राज्यकर्ते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना झाली. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य लोकसेवा आयोगाने त्यांचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचे मान्य केले. आता कसोटी आहे ती सुज्ञ पुणेकरांची.

संभाजी पाटील @pambhajisakal

Pune- कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला जाताना मतदारांच्या मनात अनेक प्रश्न असतील.

या निवडणुकीच्या निमित्ताने जो काही प्रचार झाला त्यातून मतदाराला आपले मत कोणाला द्यायचे याचा निश्चितच अंदाज आला असेल. जरी नसेल तरी त्याला निर्णय मात्र घ्यावाच लागणार आहे. मतदानाचा हक्क शंभर टक्के बजावणे हा त्याच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे.

त्यामुळे कोण आला तरी आम्हाला काय फरक पडतो, असे म्हणून आपणच आपल्याला हव्या असणाऱ्या किंवा परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी नाकारात आहोत, असा अर्थ होतो. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त होण्याची सर्वात मोठी संधी मतदानाच्या निमित्ताने मिळत आहे. ती घेतली नाही तर आपणच करंटे ठरु.

मतदानाला जाताना मात्र आपण अधिक डोळसपणे जायला हवे. कोणाची तरी हवा आहे, माझे कुटुंब पहिल्यापासून याच पक्षाला किंवा विचाराला मतदान करते, कोणी मला काही तरी प्रलोभन दाखवले, दबाव आणला किंवा एखादा उमेदवार माझ्या गल्लीतला आहे

म्हणून त्याला मतदान करण्यापेक्षा तुम्हाला नेमकं काय हवे आहे याचा आधी विचार करायला हवा. उमेदवार, त्याचे आतापर्यंतचे काम, त्याची योग्यता, काम करण्याची पद्धत, प्रश्न सोडविण्याची धमक, त्याच्या पक्षाची कामगिरी-भवितव्य, शहराच्या तसेच मतदारसंघाच्या प्रश्नांची जाण आणि प्रश्न सोडविण्यासाठीचा त्याचा रोडमॅप या सर्वच गोष्टी तपासायला हव्यात.

या निवडणुकीसाठी झालेल्या प्रचारात फारसे काही हाती लागले असे म्हणता येत नाही. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री यांनी प्रचाराच्या निमित्ताने मतदारसंघासाठी बराच वेळ दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रचारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेऊन पोटनिवडणुकीचे महत्त्व आणखी वाढवले. यानिमित्ताने मतदारसंघ आणि एकूणच नागरी प्रश्नांची चुणूक या सर्वांना पाहायला मिळाली. सर्वच पक्षांनी मूळ प्रश्नांना बगल देऊन संपूर्ण प्रचार टीकाटिप्पणी आणि राजकारणाभोवतीच फिरवला तरी येणारी महापालिका निवडणूक स्थानिक प्रश्नांभोवती,

कामांभोवतीच लढवावी लागणार याची जाणीव त्यांना नक्कीच झाली असेल. पुणेरी पाट्यांच्या मार्फत दिलेले टोमणे किंवा हिंदुत्व यापेक्षाही आम्हाला मतदार संघातील प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, हे मतदानाच्या निमित्ताने राजकारण्यांना सांगण्याची संधी आज दवडता कामा नये.

ही निवडणूक होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट असेल, त्यामुळेच अधिक दक्षतेने आणि सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागेल.

कसबा मतदारसंघातच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे हब आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी आंदोलने करावी लागतात. नव्या अभ्यासक्रमाच्या मुदतवाढीसाठी आंदोलनाचा योग्य मुहूर्त विद्यार्थ्यांनी निवडला. त्याची दखल सर्व पक्षांना घ्यावी लागली.

त्यांचे प्रश्न राज्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यायला हवेत, हा संदेश यानिमित्ताने गेला, ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

योग्य प्रश्नांची जाणीव, त्यांची मांडणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाहीतील सर्वात मोठे शस्त्र असणारे मतदान या तिन्ही गोष्टी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जुळून आल्या आहेत. त्यामुळेच योग्य निर्णय घेणे फक्त आपल्याच हातात आहे. चाणाक्ष पुणेकरांना अधिक काही सांगण्याची गरज नसतेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT