esakal
esakal
पुणे

गांधी जयंतीला राज्यात ऑफलाईन ग्रामसभेस शासनाची मंजूरी

मिलिंद संगई, बारामती

बारामती : राज्यातील ग्रामपंचायतींच्या दृष्टीने महत्वपूर्ण समजल्या जाणा-या ग्रामसभा आता ऑफलाईन घेण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. या मुळे येत्या 2 ऑक्टोबर रोजी राज्यात ज्या ग्रामपंचायतींना ऑफलाईन ग्रामसभा घ्यायच्या आहेत, त्यांना कोविडच्या नियमावलीचे पालन करुन प्रत्यक्ष सभांचे आयोजन करणे शक्य होणार आहे.

राज्य शासनाने कोविडचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केलेले आहेत. त्या अनुसार राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी जयंतीच्या दिनी होणा-या ग्रामसभा ऑफलाईन घेण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाचे अवर सचिव सुहास जाधवर यांनी जारी केलेल्या पत्रान्वये ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेता येतील हे यातून स्पष्ट झाले आहे. अर्थात ऑफलाईन ग्रामसभा घेताना प्रत्येक ग्रामपंचायतीने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगसह सॅनेटायझरचा वापर या सह इतरही मार्गदर्शक सूचनांचे पालन काटेकोरपणे करण्याच्याही सूचना यात देण्यात आल्या आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या दृष्टीने ग्रामसभांना विशेष महत्व असते. त्यातही गांधी जयंतीच्या दिवशी होणा-या ग्रामसभेला अधिकचे महत्व असते, त्या मुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर आता प्रत्यक्षपणे ग्रामसभा होणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर त्याचे स्वागतच होईल. अनेक महत्वाचे निर्णय या दिवशी घेतले जातात, अनेक वर्ष प्रत्यक्षपणे सभेचा अनुभव असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन मिटींग अवघडच जात होती, त्या मुळे आता समोरासमोर बसून होणा-या ग्रामसभेच्या निमित्ताने गावोगावी उत्साहाचे वातावरण असेल अशी चिन्हे आहेत. जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचाही हा संकेत मानला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT