school sakal
पुणे

अंगणवाडी सेविकांची निम्मी रिक्त पदे भरण्यास सरकारची परवानगी

पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या १८९ रिक्त जागांपैकी केवळ ९५ जागा भरता येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांची रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे तीन वर्षांच्या खंडानंतर ही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील निम्मीच रिक्त पदे भरण्याचा आदेश सरकारने जिल्हा परिषदांना दिला आहे. या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या १८९ रिक्त जागांपैकी केवळ ९५ जागा भरता येणार आहेत.

याशिवाय जिल्ह्यातील मदतनिसांच्या ५० जागा रिक्त असून, त्यापैकी २५ जागा भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सद्यःस्थितीत राज्यात ३ हजार ४३६ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाडीसेविकांची १ हजार ११७ तर मदतनिसांची १ हजार ८३१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी नंदूरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशीम, आणि गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, पालघर व अमरावती या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांतील सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत. या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य सर्व जिल्ह्यांमधील ५० टक्के पदे भरली जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यात एकूण ४ हजार २४६ अंगणवाड्या आणि ४५२ मिनी अंगणवाड्या आहेत. या दोन्ही अंगणवाड्यांसाठी मिळून अंगणवाडीसेविकांची एकूण ४ हजार ६९८ पदे आहेत. जिल्ह्यातील मदतनिसांची एकूण पदे ही सुमारे चार हजारांच्या आसपास आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

SCROLL FOR NEXT