gram panchayat gram panchayat
पुणे

सरकारकडून ग्रामपंचायतींना 'ऑनलाइन' व्यवहाराचा हट्ट

डिजिटलमध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेण्याची ग्रामसेवकांची मागणी; विकास कामांची बिल रखडली

चिंतामणी क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा

वडगाव निंबाळकर : ग्रामपंचायतीचा (grampanchayat) आर्थिक व्यवहार ऑनलाइन करा असा सरकारचा (maharashtra goverment) हट्ट आहे. तर प्रत्यक्ष काम करताना अनेक त्रुटी येतात. त्यामुळे यातील अडचणी समजून घ्या, असे ग्रामसेवकांचे मत आहे. शासनाच्या ऑनलाइन पब्लिक फायनाशिअल मॅनेजमेंट सिस्टीम (PFMS) या कार्यप्रणालीचा वापर केला नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बहुतांशी ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. परिणामी विकास कामांवर याचा परिणाम होत आहे. (Government urges GramPanchayats online transactions)

ग्रामपंचायतीला शासनाकडून येणारा निधी खर्च करताना त्याच्या ऑनलाइन नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या पीएफएमएस कार्यप्रणालीचा वापर करा, असे आदेश गेल्या वर्षी शासनाकडून सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. कार्यप्रणालीवर ऑनलाइन नोंदी करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये नेमलेल्या संगणक परिचालकांची मदत घ्या, असे सुचवले होते. परंतु, यामध्ये अनेक त्रुटी आहेत असे सांगून याची अंमलबजावणी ग्रामसेवकांकडून झाली नाही. पुणे जिह्यातील १४८५ ग्रामपंचायतीपैकी फक्त २०० ते २५० ग्रामपंचायतींनी पीएफएमएस कार्यप्रणालीचा वापर करून व्यवहार केले आहेत.

इतर ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांनी पहा आणि थांबा अशी भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात लॉकडाउनमुळे कामकाजही मंद गतीने होते. दरम्यानच्या काळात विकास कामे झाली. कामाची बिले मिळावीत यासाठी ठेकेदारांनी ग्रामसेवकांच्या मागे तगादा लावला आहे तर ग्रामसेवक पीएफएमएस प्रणालीत अडचणी असल्याचे सांगत आहेत. वरिष्ठांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. बारामती तालुक्यातील ९९ पैकी १० ग्रामपंचायतीने कार्यप्रणालीतून काम केले आहे. यामधील गोजुबावी, काळखैरेवाडी, मुढाळे, पाहुणेवाडी, शिरष्णे, सोनगाव, सुपे या ग्रामपंचायतीचे प्रत्येकी एक बिल असे ४ लाख ६६ हजार ५५६ रुपये बिल पेंडिंग आहेत.

"पीएफएमएस कार्यप्रणालीची नोंदणी करण्यात राज्यात दोन नंबरचे काम पुणे जिल्ह्याचे आहे. याबाबत सर्व ग्रामसेवकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले आहे. तालुका पातळीवर मदतीसाठी प्रतिनिधी दिला आहे. पद्धत नविन असल्याने अवघड वाटत असले तरी वापरातूनच शिकता येईल. उद्भवलेल्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील," असे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.

ग्रामसेवक संघटना जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ म्हणाले, "पीएफएमएस प्रणालीमुळे कामात पारदर्शकता येईल. पण प्रक्रीया क्लिष्ट आहे. तांत्रिक अडचणी दूर करणे गरजेचे आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT